– उपमुख्यमंत्री अजितदादांना प.पू.बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती च्यावतीने आदरांजली !
नागपूर :- महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे एक निर्भीड, बेधडक आणि सामान्य जनतेचे काम तत्परतेने करणारा नेता हरविला ! अजितदादा पवार हे निर्भीड, बेधडक, व्यक्तिमत्व असलेले, सर्वसामान्य जनतेचे प्रश्नांची जाण असणारे, तसेच प्रशासकीय नियंत्रणेवर वचक ठेवणारे, कुठलेही जनसेवेचे काम पूर्णतः नेण्याच्या त्यांचा हतखंड होता. प.पूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीशी जिव्हाळ्याचे नाते होते. ते अनेकदा दीक्षाभूमीवरील आले होते. कधी कधी न सांगताही दीक्षाभूमीवर अभिवादन करून जात होते. अजितदादांचा बाबासाहेबांच्या परती श्रद्धा व आदर होता.
प.पूज्य बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे विश्वस्त विलास गजघाटे यांच्यावतीने विनम्र आदरांजली अर्पण !




