spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

आ.संदीप जोशी यांची अजित पवार यांना श्रद्धांजली, क्रीडा क्षेत्र अनाथ झाले!

महाराष्ट्राच्या राजकारणातील हाजरजबाबी, धडाडीचे नेतृत्व आणि कामाचा प्रचंड उरक असलेले आमचे मार्गदर्शक, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत धक्कादायक आणि मनाला चटका लावणारे आहे.

महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या निवडणुकीच्या निमित्ताने तीन महिन्यांपूर्वीच माझा त्यांच्याशी जवळून संबंध आला. त्यांच्या दिलखुलास व्यक्तिमत्त्वाच्या प्रेमातच मी पडलो. ‘दादा, मी तुमचा फॅन आहे’, असे त्यांना म्हणताच, ‘अरे राव… मग देवेंद्रचं काय होणार?’ अशी मिश्किल टिपणी त्यांनी केली. त्यावर, ‘मी देवेंद्रजींचा मित्र आहे; मात्र आपला फॅन आहे,’ असे उत्तर देताच त्यांनी मला घट्ट मिठी मारली.

ऑलिम्पिक संघटनेच्या निवडणुकीत मी त्यांच्यावर टीकाही केली होती; मात्र ती त्यांनी अगदी खिलाडूवृत्तीने घेतली. त्या निवडणुकीत आम्ही सर्व सदस्यांनी त्यांना बिनविरोध निवडून दिले. त्यांनी या संघटनेच्या कार्यकारिणीत मला उपाध्यक्षपदाची जबाबदारी देऊन माझ्यावर जो विश्वास दाखविला, त्याबद्दल मी सदैव ऋणी राहीन. सकाळी ६ पासून रात्री ११ पर्यंत अखंड काम करण्याची त्यांची वृत्ती युवा पिढीसाठी खरोखरच प्रेरणादायी आहे.

प्रशासनावरील त्यांची जरब, शब्दाला जागणारा नेता आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांची जाण असलेला एक लोकनेता आज आपण गमावला आहे. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक आणि क्रीडा क्षेत्राची कधीही भरून न निघणारी हानी झाली आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. ईश्वर पवार कुटुंबाला या दु:खातून सावरण्याची शक्ती देवो, हीच प्रार्थना.

– संदीप जोशी, उपाध्यक्ष, महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटना

Popular Articles