spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

संत ताजुद्दीनबाबांचा जन्मोत्सव उत्साहात साजरा, सुख समृद्धीसाठी दुवा, सर्वधर्म समभाव एकतेचे प्रतिक

खापा :- सर्वधर्म समभावाचे प्रतीक असलेले सुफी संत हजरत बाबा ताजुद्दीन रहमतुल्लाह अलैह यांचा १६५ वा जन्मोत्सव खापा येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या पर्वावर खापा परिसरात बंधुभाव प्रकर्षाने दिसून येत होता. सर्व धर्मपंथीयांच्या वतीने ताजुद्दीन बाबांची जयंती जल्लोषात साजरी करण्यात आली.

बी. एल. एस. ग्रुपचे आयन शेख, जिशान शेख, अर्शद पठाण, शाकीर शेख, फिरोज शेख, साहिल शेख, मकसूद शेख यांच्या कडून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ताजुद्दीन बाबांच्या जन्मोत्सव निमित्त मंगळवार २७ जानेवारीला सायंकाळी ७ वाजता भवानी माता मंदिर बाजार चौक येथे उपस्थित भक्तांच्यावतीने ताजुद्दीन बाबा यांच्या प्रतिमेवर हार, गुलाबाचे फुल चढविण्यात आले. खापा मस्जिदचे मौलाना मकसूद आलम यांच्याद्वारे फातेहा व सर्वांसाठी विशेष दुवा करण्यात आली.

नगराध्यक्ष पियूष बुरडे, उपाध्यक्ष सुनिल पाहुणे, नगरसेवक मिलिंद बुरडे, अंजली आनंद मेनकुदळे, किशोर आष्टनकर, संजय सोनकुसळे, प्रशांत तुमाने, नामदेव गजभिये, छगन कवडे, सादिक बाघाडे, अण्णाजी तळपल्लीवार, बब्बू शेख, सकुर शेख, रफीक शेख, शांताराम मारोतकर, मंगेश बोंदरे, गुड्डू बोंदरे यांच्या प्रमुख उपस्थितीत लहान मुलांच्या हस्ते केक कापून भाविकांमध्ये वितरित करण्यात आला. शेकडोच्या संख्येने भाविकानीं महाप्रसादाचा लाभ घेतला. यावेळी डि.जे. लावत हा जन्मोत्सव मोठ्या उत्सवात साजरा करण्यात आला.

आयोजनाकरिता कशिफ सुभेदार, प्यारु शेख, अल्फेज शेख, सोहेल शेख, तुषार मौदेकर, अकिल शेख, रुपेश मोगरे, युनुस कुरेशी, किशोर बुरडे, साबू शेख, शाहनवाज शेख, मोहसीन पठाण, असलम शेख, गुड्डू पठाण, समीर पठाण, किशोर रेवतकर, सतीश बुरडे, सरफराज सुभेदार, अफसर छवारे आदींनी परिश्रम घेतले. मोठ्या संख्येने भाविकांची व मित्र परिवार उपस्थिती होती.

Popular Articles