spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

पोलीस स्टेशन कळमेश्वर अंतर्गत (OYO) हॉटेलवर कारवाई केले बाबत

कळमेश्वर :- कळमेश्वर न्या ठाणेदाराचे ओयो हॉटेलला प्रोटेक्शन अशा शिर्षकाखाली बातमी प्रसीध्दी झाली आहे. सदर प्रकरणाची सविस्तर माहीती अशी आहे की, दिनांक २३/०१/२०२६ रोजी कळमेश्वर पोलीस स्टेशन हद्दीतील फेटरी ओयो हॉटेल येथे एका युवतीचा खुन झाले प्रकरणी गुन्हा नोंद आहे. सदर गुन्हयाचा तपासात निष्पन्न झाले की, नमुद हॉटेल मालकाजवळ ओयो कंपनीचे कोणतेही कागदपत्रे अथवा परवाना नसताना ओयो कंपनीचे लोगो चा वापर करून अनधिकृत पणे ओयो कंपनीचे नाव देऊन हॉटेल चालवत आहे.

नमुद आरोपीने स्वतःचे आर्थिक फायद्याकरीता ओयो कंपनीचे लोगो वापरून कंपनीची दिशाभुल करून फसवणूक, फसवणूक करण्याच्या उद्देशाने गुन्हेगारी करणे, चुकीची माहिती देणे, विश्वासभंग, करारभंग, गोपनीयतेचा भंग, गोपनीय माहितीचा गैरवापर, ट्रेडमार्कच्या मालकाच्या संमतीशिवाय खोटे बोलणे आणि खोटे ट्रेडमार्क लागू करणे तसेच तोतयागिरी केल्याने तात्काळ दिनांक २४/०१/२०२६ रोजी नमुद हॉटेल चालक/मालक आरोपी नामे राहुल सुरेश मिश्रा, वय ३३ वर्षे रा वार्ड कं १, एमआयडीसी रोड, कळमेश्वर आणि जागेचे मालक यांच्याविरुद्ध कलम ३१८,३३६,३४० भान्यासं सहकलम व्यापर चिन्ह अधिनियम (ट्रेड मार्क अॅक्ट) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. आरोपीला तात्काळ अटक करण्यात आली होती.

Popular Articles