spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

अवैधरित्या ५२ ताशपत्त्यांचा जुगार खेळणाऱ्या आरोपीतांविरूध्द गुन्हा नोंद

अरोली :- अरोली पोलीसांना गुप्त बातमीदारांमार्फत खात्रीशीर माहीती मिळाली की, धर्मापुरी येथे काही इसम ५२ ताशपत्त्यांचा जुगार खेळत आहे. मिळालेल्या माहीतीच्या आधारे पोलीस घटनास्थळी पोहचुन धाड टाकली असता आरोपी नामे १) रूपेश सत्यवान चारमोडे, वय २५ वर्ष, रा. धर्मापूरी २) संदेश अशोक ठवकर, वय २९ वर्ष, रा. मोरगाव ३) जिवण रेवनाथ वाघ, वय ३२ वर्ष, रा. धर्मापूरी ४) अंकित साहादेव मोटघरे, वय २५ वर्ष, रा. धर्मापूरी ५) करण राजकुमार डडोरे, वय २९ वर्ष, रा. मोरगाव ६) गणेश भाउराव साठवणे, वय २५ वर्ष, रा. तेली मांगली, ता. मौदा, जि. नागपूर ७) हर्षल राजाराम बागडे, रा. शाहापूर, ता. जि. भंडारा हे ५२ ताशपत्त्यांचा जुगार खेळतांना जागीच मिळून आले. आरोपीतांच्या ताब्यातुन ५२ तासपत्ते, रोख रक्कम ३५८०/- रूपये व सहा मोबाईल किंमती ५२,०००/- रूपये व घटनास्थळावर मिळून आलेली हिरो कंपनीची पेंशन प्लस एम एच ४०/एम २७१२ किमती ४०,०००/- रूपये असा एकूण ९५,६८०/- रूपये मुद्देमाल जप्त करण्यात आले आहे.

नमुद आरोपीतांविरूध्द पोलीस स्टेशन अरोली येथे १२ (अ) महाराष्ट्र जुगार कायदा अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

Popular Articles