spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

गोलेवाडीत ‘ब्रह्मराक्षस’ नाटकाला रसिकांचा उदंड प्रतिसाद; दिग्गज मान्यवरांची उपस्थिती

हंसराज, प्रतिनिधी भंडारा गोलेवाडी :- भंडारा तालुक्यातील गोलेवाडी येथे प्रजासत्ताक दिन आणि शंकरपटाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या ‘ब्रह्मराक्षस’ या झाडीपट्टी नाटकाला नाट्यरसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. संमिश्र बहुउद्देशीय सार्वजनिक नाट्य कला मंडळाच्या वतीने २६ जानेवारी रोजी या नाट्यप्रयोगाचे आयोजन करण्यात आले होते.

या नाट्यप्रयोगाचे उद्घाटन विकास बांगडे , सहउद्घाटन योगीता गायकवाड , प्रमुख अतिथी सोनु गणेर (लोणारे) यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी लुहाष गोंडाने, अशोक जिभकाटे , सरपंच सुनंदा मडावी,अर्जुन तिरपुडे , रमेश लोणारे , रामकृष्ण बांगडे , राजेश वैद्य , भीम आर्मी अध्यक्ष शुभम लोणारे ,मनीष वासनिक , नरहरी मडावी , प्रशांत दहिवले ,सूरज लोणारे , पराग रामटेके, चेतन वासनिक, मुकेश, बांगडे गोपाल मडावी ,ईश्वर पडोळे,रवि रंगारी ,पराग हटवार.,परिसरातील मान्यवर, ग्रामस्थ व नाट्यरसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नाटकातील कलाकारांनी आपल्या दमदार अभिनयातून प्रेक्षकांची मने जिंकली. रहस्य, थरार व सामाजिक आशय यांची सांगड घालणाऱ्या या नाटकाला प्रेक्षकांकडून टाळ्यांचा कडकडाट मिळाला. विशेषतः प्रमुख भूमिकेतील कलाकारांच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक करण्यात आले.

कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी प्रमुख पाहुण्यांनी बोलताना ग्रामीण भागात अशा दर्जेदार नाट्यप्रयोगांमुळे सांस्कृतिक जाणीव वृद्धिंगत होत असल्याचे सांगून आयोजकांचे अभिनंदन केले. तसेच भविष्यातही असे उपक्रम सातत्याने राबवावेत, असे मत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन फुलचंद दहिवले , यांनी केले तर आभार प्रदर्शन निकेश खोब्रागडे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी नाट्य मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले.

Popular Articles