spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन 

गडचिरोली :- Kairos security health and composite services pvt ltd.Hyderabad, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, गडचिरोली व मॉडेल करिअर सेंटर, गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 02 फेब्रुवारी 2026 ते 07 फेब्रुवारी 2026 या कालावधीत तालुकानिहाय ठिक 11.00 वाजता पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा आयोजित करण्यांत आलेला आहे.

सदर रोजगार मेळावा मध्ये Kairos security health and composite services pvt ltd हि कंपनी उपस्थित राहणार असून उमेदवारांना रोजगार मेळाव्याचा लाभ घेण्यासाठी‍सदर रोजगार मेळावा करिता असलेले ईच्छूक उमेदवारांनी स्वत:चा बायोडाटा, शैक्षणिक प्रमाणपत्र,गुणपत्रक,आधार कार्ड, मतदान ओळखपत्र,बॅक पासबुक (मुळ व झेराक्स्), पोलीस व्हेरीफीकेशन , फोटो -6, डॉक्टर कडून मेडीकल फिटनेस प्रमाणपत्र सह स्वखर्चाने दिनांक 02 फेब्रुवारी 2026 ते 07 फेब्रुवारी 2026 या कालावधीत खाली दिलेल्या ठिकानावरती उपस्थित राहून रोजगार मेळाव्याचा लाभ घ्यावा. असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, गडचिरोली या कार्यालयाने आवाहन केले आहे. अधिक माहितीकरिता जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, गडचिरोली या कार्यालयाशी संपर्क करा. दुरध्वनी क्र.07132-222368. संपर्क साधण्याचे आवाहन सहायक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, गडचिरोली यांनी केले आहे.

Popular Articles