काटोल :- काटोल पोलीस मोटर सायकल चोरीचे गुन्हयांच्या तपासात पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलींग करीत असता त्यांना आरोपी नामे यश विनोद गायकवाड, वय १९ वर्ष, रा. अर्जुन नगर, काटोल हा काटोल बायपास रोडवर संशयितरित्या मोटर सायकवर फिरतांना दिसुन आला. पोलीसांनी आरोपीला थांबण्यास सांगितले असता त्याने पळुन जाण्याचा प्रयत्न केला. पोलीसांनी शिताफिने आरोपीला पकडुन त्याला त्याचे जवळ असलेल्या मोटर सायकल क्र एम एच ४० सी पी ७१९६ बाबत विचारणा केली असता तो उड़वा उडवीची उत्तरे देत असल्याने त्यावरील संशय बळावल्याने सदर मोटर सायकलचे चेचीस व इंजिन क्रमाकाची पाहणी केली असता सदर मोटर सायकल ही पोलीस स्टेशन काटोल अप क्र ९६३/२०२५ कलम ३०३(२) भा. न्या.सं. गुन्हयातील चोरी गेलेली मोटर सायकल असल्याचे दिसुन आले.
नमुद आरोपीस ताब्यात घेवुन कौश्यल्यपुर्ण तपास करीत विचारपुस केली असता त्याने पोलीस स्टेशन काटोल हद्दीतील पानवाडी, वडली, येरला घोटे, राठी ले आउट धंतोली काटोल येथुन त्याचे तीन साथीदार (विधीसंघर्षग्रस्त बालक) यांच्या सह मिळुन एकुण ४ दुचाकी मोटर सायकली चोरी केले असल्याची माहीती दिली. त्यासंबधी पोलीस स्टेशन काटोल येथे मोटर सायकल चोरीचे गुन्हे नोंद होते. काटोल पोलीसांच्या सर्तकतेमुळे ४ मोटर सायकल चोरीचे गुन्हे उघड झाले. पोलीसांनी नमुद आरोपीकडून चोरीस गेलेल्या एकुण ४ मोटर सायकल किंमती २,४०,०००/- रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे.




