spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

अंगणवाडी मदतनीस पदभरतीचा वाद आता उच्च न्यायालयात !

– प्रशासकीय यंत्रणेच्या निर्णयाला आव्हान; वर्षा लांजेवार यांची नागपूर खंडपीठात धाव

हंसराज, प्रतिनिधी भंडारा  साकोली :- साकोली तालुक्यातील ग्रा.पं. वडेगांव अंतर्गत येणाऱ्या वॉर्ड क्र. ३ म्हणजेचं ‘शंकरपुर’ येथील मिनी अंगणवाडी केंद्रातील मदतनीस पदभरती प्रकरणी स्थानिक उमेदवाराच्या अटीवरून शंकरपुर ग्रामस्थांच्या बाजूने निकाल दिलेल्या विभागीय आयुक्त व मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे आदेश अमान्य असल्याने वडेगांव येथील उमेदवार वर्षा लांजेवार यांनी आयुक्त, जिल्हा कार्यक्रम अधिकारी व शंकरपुर ग्रामस्थांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालय – नागपूर खंडपीठ येथे याचिका दाखल केली आहे.

२ एप्रिल २०२५ रोजी शंकरपुर ग्रामस्थांच्या आक्षेपाची सुनावणी घेत प्रकल्प अधिकारी योगिता परसमोडे यांनी शंकरपुरच्या स्थानिक उमेदवारांना डावलून वडेगांव येथील उमेदवार वर्षा लांजेवार यांची नियुक्ती केली होती. मात्र; २४ जुलै २०२५ रोजी शंकरपुर ग्रामस्थांच्या आक्षेपाची सुनावणी घेत मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंदकुमार साळवे यांनी भरती प्रक्रिया योग्यरित्या पार न पडल्याने नव्याने भरती प्रक्रिया राबविण्याचे आदेश साकोली बाल प्रकल्पातील अधिकाऱ्यांना दिले होते.

जिल्हा कार्यक्रम अधिकाऱ्यांचे आदेश मान्य नसल्याने वर्षा लांजेवार यांनी विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांच्या कडे याचिका दाखल केली होती. ११ सप्टेंबर २०२५ रोजी सुनावणी दरम्यान देखील त्यांनी वर्षा लांजेवार यांची याचिका फेटाळून मुख्य कार्यक्रम अधिकाऱ्यांचे आदेश कायम केले होते. मात्र; सलग दोन पराभवानंतर देखील वर्षा लांजेवार यांनी मुंबई उच्च न्यायालय – नागपूर खंडपीठ येथे तीन मोठ्या यंत्रणेच्या विरोधात याचिका दाखल केल्याने संपूर्ण विदर्भाचे लक्ष या निकालाकडे लागले आहे. स्थानिक उमेदवाराचा हक्क की प्रशासकीय नियम, यावर न्यायालय काय निकाल देते हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

_“देशात लोकशाही आहे व प्रत्येक पीडित नागरिकाला न्यायालयात दाद मागण्याचा अधिकार आहे. आम्ही सुनावणीस सज्ज आहोतचं; मात्र, आमची तयारी दिल्लीच्या सर्वोच्च न्यायालयापर्यंत आहे.”_

 – शेजल भारत सयाम (मदतनीस उमेदवार, अंगणवाडी केंद्र शंकरपुर/वडे.)_

_“वडेगांवची पहिली अंगणवाडी सेविका ही माझी आईचं असती पण नियमात बसत नाहीत म्हणून आम्हाला प्रपत्रचं भरू दिलं नाही. मग आता शासन निर्णय (GR) न बदलता तुमचे नियम कसे काय बदलले” ?_

 – खुमराज कन्हैयालाल बिसेन सुशिक्षित तरुण, शंकरपुर/वडे.

_“जो पर्यंत या गावचा पैलवान जिवंत आहे तोपर्यंत या गावावर आच देखील येऊ देणार नाही. ज्या मातीत आमचा जन्म झाला, जिथे आम्ही लहान्याचे मोठे झालो त्या आईसाठी लढायला आम्ही सदैव तत्पर आहोत.”_

 – हेमराज तानू सयाम सामाजिक कार्यकर्ता, शंकरपुर/वडे.)

Popular Articles