spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

मकरसंक्रांती निमित्त महिला मेळावा

खापा, वार्ताहर :- नवीन वस्ती परिसरात महिला बचत गट आणि प्रभाग आठचे नगरसेवक निखिल आष्टनकर, नगरसेविका निशा कठौते यांच्यावतीने मकरसंक्रांती निमित्त हळदीकुंकू कार्यक्रम तसेच महिला मेळाव्याचे उत्साह पूर्ण वातावरणात आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले गेले.

कार्यक्रमाचे उद्घाटन नगराध्यक्ष पीयूष बुरडे यांच्या हस्ते झाले. प्रमुख अतिथी म्हणून नगरसेवक निखिल आष्टनकर, नगरसेविका नीशा कठोते यांची उपस्थिती होती. चाफले मॅडम आणि बचत गटाच्या सदस्यांकडून अध्यक्ष आणि नगरसेवकांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी नगराध्यक्ष पीयूष बुरडे यांनी महिला सशक्तीकरण तसेच महिलांसाठी उपलब्ध असलेल्या रोजगाराच्या संधी आणि शासकीय योजनांवर प्रकाश टाकला. कार्यक्रमात महिलांना वाण व भेटवस्तू देऊन त्यांचा आनंद द्विगुणित केला. या कार्यक्रमा च्या यशस्वीतेसाठी बचत गटाच्या सदस्यांनी तसेच परिसरातील महिला व नागरिकांनी मोलाचे सहकार्य केले.

Popular Articles