spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

खापा येथे हुतात्मादिन साजरा, उपमुख्यमंत्री अजित दादा पवार, अपघातात प्राण गमाविलेल्या पाचही जणांना सामूहिक श्रद्धांजली

खापा, वार्ताहर :- शहर काँग्रेस कमिटी व शहारातील सन्माननीय नागरिकांच्या वतीने महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त बाजार चौक येथे स्थित महात्मा गांधीजींच्या पुतळ्यास माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.

तसेच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि दिग्गज नेते अजित दादा पवार यांचे विमान दुर्घटनेत अपघाती दुःखद निधन झाले. अजितदादा म्हणजे केवळ एक नेता, नेता नव्हते तर ते विकासाचे दुसरे नाव होते. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राने एक शिस्तप्रिय आणि कर्तव्यदक्ष मार्गदर्शक गमाविला आहे, अशा शोकसंवेदना उपस्थितांनी व्यक्त केल्या. दोन मिनिटे मौन पाळून लोक नेत्याला व अपघातात प्राण गमाविलेल्या पाचही जणांना सामूहिक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

यावेळी न. प. खापाचे स्वीकृत नगरसेवक छगन कवडे, काँग्रेस कामेटीचे अध्यक्ष सुरेश चंद्रवंशी, सेवादल अध्यक्ष नारायण लांबट, केदारनाथ बहुउद्देशीय समाज विकास संस्थेचे अध्यक्ष व्यंकटेश (अण्णाजी) तालपल्लीवार, सचिव सुरेश मारोतकर, सामाजिक कार्यकर्ते मकसूद शेख, अशोक दंदे, चंद्रशेखर मांडवकर, जितेंद्र गुजर, नरेश गाडीगोणे, लहू गोडबोले, जगदीश शेंडे यांच्यासह सर्व पक्षाचे कार्यकर्ते व शहारातील सन्माननीय नागरीक उपस्थित होते.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.