spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

साक्षगंध आटोपून परतणाऱ्या महिलेचे दागिने रिक्षात लंपास; दोन महिला अटकेत

– नागपूरच्या दोन महिलांविरुद्ध गुन्हा दाखल

हंसराज, प्रतिनिधी भंडारा :- ऑटोने प्रवास करणाऱ्या एका महिलेच्या गळ्यातील सोन्याचे पदक लंपास करणाऱ्या दोन महिला चोरट्यांविरुद्ध भंडारा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही घटना २९ जानेवारी रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास भंडारा बस स्टॉप परिसरात घडली.

शामकला लेखीराम तोरणकर (४५, रा. सडक अर्जुनी, जि. गोंदिया) या आपल्या भाचीचा साक्षगंधाचा कार्यक्रम आटोपून रिक्षाने बस स्टॉपकडे जात होत्या. याच रिक्षात सारिका चेतन शेंडे (३०) आणि ज्योत्स्ना उमेश लोंढे (४२, दोन्ही रा. कळमना, नागपूर) या दोन महिला प्रवासी म्हणून बसल्या होत्या. प्रवासादरम्यान या दोन्ही आरोपी महिलांनी संगनमत करून शामकला यांच्या गळ्यातील १० हजार रुपये किमतीचे २ ग्रॅम वजनाचे सोन्याचे पदक शिताफीने चोरून नेले.

दागिना चोरीला गेल्याचे लक्षात येताच फिर्यादीने भंडारा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी आरोपी महिलांविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३०३ (२), ३ (५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चोपकर करीत आहेत.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.