spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

राजीव नगरात घरफोडी; ४८ हजारांचा मुद्देमाल लंपास

हंसराज, प्रतिनिधी भंडारा :- शहरालगतच्या राजीव नगर (बेला) येथे एका बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने ४८ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. ही घटना २८ जानेवारी रोजी सायंकाळी ५:४५ ते ७:४५ वाजताच्या सुमारास घडली.

फिर्यादी मनोज अंबादास इंगळे (वय ५६) हे कामानिमित्त जिल्हा परिषद चौक येथे गेले होते. दरम्यान, चोरट्याने त्यांच्या घराच्या समोरील दाराचा कडी-कोंडा तोडून आत प्रवेश केला. देवघरातील रॅकमध्ये ठेवलेली ४२ हजार रुपयांची रोकड आणि ६ हजार रुपये किमतीची १०० ग्रॅम चांदी, असा एकूण ४८ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला.

घरी परतल्यावर चोरी झाल्याचे लक्षात येताच इंगळे यांनी भंडारा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. यावरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३०५, ३३१(३), ३३१(४) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक पुंडगे करीत आहेत.

Popular Articles