spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

महापौर व उपमहापौर निवडीसाठी पहिली विशेष सभा १० फेब्रुवारी रोजी

चंद्रपूर :- चंद्रपूर महानगरपालिका महापौर व उपमहापौर निवडीसाठी मा. नागपूर विभागीय आयुक्त यांनी निश्चित केल्याप्रमाणे महानगरपालिकेच्या निर्वाचित सदस्यांची पहिली विशेष सभा १० फेब्रुवारी २०२६ रोजी मनपा राणी हिराई सभागृहात सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आली आहे.

नागपुर विभागीय आयुक्त यांनी निश्चित केल्यानुसार चंद्रपूर मनपाच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी निवडणुकीची विशेष सभा पिठासीन अधिकारी जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. त्यानुसार निवडणुकीचा पुढील कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे. ज्यामध्ये महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीतील दुसऱ्या माळ्यावर नगरसचिव यांच्या कक्षात नामनिर्देशन पत्र मिळणार असून याच ठिकाणी गुरुवार ५ फेब्रुवारी या तारखेस सकाळी ११ ते दुपारी ०३:०० वाजेपर्यंत स्वीकारले जाणार आहेत.

विशेष सभा सुरू झाल्यावर छाननी –

१० फेब्रुवारीला सकाळी ११ वाजता राणी हिराई सभागृहात विशेष सभा आयोजित केली आहे. पिठासीन अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली या सभेमध्ये नामनिर्देशन पत्राची छाननी होणार आहे. छाननीअंती वैध उमेदवारांची नावे पिठासीन अधिकारी हे घोषित करतील. यानंतर पंधरा मिनिटाच्या कालावधीत लेखी नोटीस देऊन उमेदवारी मागे घेता येणार आहे व त्यानंतर निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची नावे घोषित करून हातवर करून मतांची नोंद घेण्यात येणार आहे.उक्त प्रक्रियेनंतर पीठासीन अधिकारी निवडणूक निर्णयाची घोषणा करतील.

स्वतःला दाखल करावे लागणार नामनिर्देशन –

नामनिर्देशन पत्र, ओळखपत्राची सत्यप्नत निवडणूक लढविणाऱ्या निर्वाचित पालिका सदस्य यांना स्वतः दाखल करावी लागणार आहे. महापौर आणि उपमहापौर पदासाठी प्रत्येक उमेदवारास चारपेक्षा अधिक नामनिर्देशन पत्र दाखल करता येणार नाहीत. या पदासाठी कोणत्याही पालिका सदस्यास एकापेक्षा अधिक उमेदवाराची नामनिर्देशन पत्रे सूचित करता येणार नाहीत किंवा त्यास अनुमोदनही देता येणार नाही.

Popular Articles