किशोर साहू, मौदा :- जिल्हा परिषद प्राथमिक सेमी इंग्रजी शाळा भोवरी येथील मुख्याध्यापिका पठाण तब्बसूम अयुबखान यांनी शालेय जीवनाचे महत्व भोवरी या गावातील ग्रामस्थांना पटवून देण्यासाठी नेहमीच अग्रेसर असतात.
पालक सभेत क्रीड़ा साहित्यासाठी मागणी मांडली असता पालक तसेच इतर ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन क्रिडा साहित्य उपलब्ध करून देऊ असे आश्वासन दिले आणि पूर्ण सुद्धा केले. लोकसहभागातून शाळेसाठी लेझीम, बॅडमिंटन, कॅरम इत्यादी साहित्य शाळेला देण्यात आले.
मुख्याध्यापक यांनी या प्रक्रियेमध्ये मोलाचा वाटा उचलला. याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अंकुश निरगुळकर , उपाध्यक्ष प्रल्हाद वैद्य तसेच राहुल वैद्य, दिनेश बावणे, माधवराव देशमुख, ग्राम पंचायत सदस्य काशिनाथ गिर्हेपुंजे , पोलिस पाटील प्रशांत पाटील आणि सर्व ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक यांनी केले.या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष प्रयत्न स्वयंपाकी शोभा बावणे यांनी केले.








