– भदंत आनंद समता परिषद बाजार चौक कोहळी येथे धम्म परिषदेचे आयोजन शुक्रवारपासून
नागपूर :- प्रियदर्शी चॅरिटेबल ट्रस्ट कोडी यांच्या वतीने चौथ्या धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले असून 6 फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजतापासून तर सायंकाळी १० वाजेपर्यंत, भदंत आनंद समता परिसर बाजार चौक कोहळी ता.कळमेश्वर जि. नागपूर येथे या धम्म परिषदेत धम्म ध्वजारोहन, बुद्धवंदना, धम्म रॅली, पवित्र पाठ, धम्मदेशना, नाट्य, परिसंवाद, भोजनदान, सत्कार, प्रबोधन, बुद्ध भीमगीते, या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. आंबेडकरवादी दृष्टिकोनातून बुद्ध धम्म, त्यागमूर्ती माता रमाई यांचा जीवन संघर्ष, तसेच दीक्षाभूमीवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मदीक्षेला 69 वर्ष पुर्ण होत आहेत. म्हणून धर्मांतराची 69 वर्ष आणि समाज वास्तव्य या विषयावर चर्चासत्र आयोजन करण्यात आले आहे. काटोल चे भीमेश भारती यांचा बुद्ध भीम गीते तसेच डॉ.रामपाल महाराज धारकर यांचा प्रबोधनात्मक कार्यक्रम. हे सर्व कार्यक्रम ६ ते ८ फरवरी च्या दरम्यान आयोजित केले गेले आहे. धम्म परिषदेच्या कार्यक्रमाला तन-मन-धनाने सहकार्य करावे तसेच पांढरे वस्त्र परिधान करून यावे अशी विनंती केली जात आहे.
या धम्म परिषदेच्या कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन धम्मपरिषदेचे आयोजक रेश्मा शैलेश उके यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.








