spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

पंढरपूर आषाढी वारीतील अन्न व पेयपदार्थांच्या सुरक्षिततेसाठी अन्न व औषध प्रशासन विभाग सजग व सज्ज – अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ.  

 

मुंबईदि. 25 :- पंढरपूर आषाढी एकादशी निमित्त लाखो वारकरी पंढरपूरकडे पायी प्रस्थान करत असतात. वारी मार्गावर आणि पंढरपूर व परिसरात वारकऱ्यांना वाटप होणारे अन्न व पेयपदार्थ आरोग्यदृष्ट्या सुरक्षितस्वच्छ व गुणवत्तापूर्ण राहावेत यासाठी अन्न व औषध प्रशासन सजग व सज्ज झाला असून अन्न व पाण्याच्या सुरक्षिततेसाठी अन्न व औषध प्रशासनाने  प्रभावी योजना आखल्या आहेतअशी माहिती अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिली.

अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ म्हणालेआषाढी वारी मार्गावर सेवाभावी संस्थास्वयंसेवक आणि दानशूर मंडळी मोठ्या प्रमाणावर मोफत अन्न व पाण्याचे वाटप करतात. मात्रखुले अन्नतात्पुरत्या ठिकाणी तयार होणारे पदार्थवातावरणीय बदल व स्वच्छतेचा अभाव यामुळे अन्न विषबाधा किंवा इतर अन्नजन्य आजारांचा धोका निर्माण होऊ नये यासाठी प्रभावी उपाययोजना राबविण्याचे निर्देश अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. 

आषाढी वारी मार्गावरील तसेच पंढरपूर व आजूबाजूच्या परिसरातील उपहारगृहेमिठाई उत्पादक व अन्न विक्री आस्थापनांची काटेकोर तपासणी करण्यात येत आहे. पालख्यामुक्कामस्थळवाटप केंद्रमंडप व भंडारा स्थळांवर भेटी देऊन अन्न सुरक्षा व स्वच्छता मार्गदर्शक तत्वांचे पालन केले जात आहे की नाहीयाची पडताळणी करण्यात येत आहे.

अन्न वाटप करणाऱ्या संस्थांकडे भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरण (FSSAI) नोंदणी अथवा परवाना आहे की नाही याची खात्री करून घेणे व नोंदणी नसल्यास तातडीने तात्पुरती नोंदणी मिळविण्यासाठी सहकार्य करणे. अन्न तयार करणाऱ्या ठिकाणी भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणच्या (FSSAI) Schedule ४ अंतर्गत असलेल्या स्वच्छते संदर्भातील तरतुदींचे पालन होत आहे की नाहीयाची तपासणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

अन्न वाटप करणारे स्वयंसेवकसंस्थाभंडारा आयोजक यांना लघु प्रशिक्षण दिले जात आहे. स्वच्छ अन्न सुरक्षित वारी या घोषवाक्याखाली माहितीपत्रकेपोस्टर्सबॅनर आदी माध्यमातून जनजागृती केली जात असल्याचे सांगून  झिरवाळ म्हणालेवारी मार्गावर अन्न सुरक्षा जनजागृती व अन्न तपासणीसाठी ‘Food Safety on Wheels’ वाहनांचा प्रभावी वापर केला जात आहे. दूषित अन्न किंवा पाणी टाळावे याबाबत वारकऱ्यांमध्येही जागरूकता निर्माण केली जात आहे. सडलेलेघाणीत तयार झालेले अन्न आढळल्यास त्वरित नमुने घेऊन प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच अन्नजन्य आजार आढळल्यास तत्काळ आरोग्य विभागाशी संपर्क साधून कार्यवाही केली जाईल व जिल्हास्तरीय यंत्रणांशी सतत समन्वय ठेवण्यात येईल.

आषाढी वारी स्वच्छसुरक्षित व आरोग्यपूर्ण होण्यासाठी अन्न व औषध प्रशासनामार्फत उचललेले हे पाऊल निश्चितच महत्त्वपूर्ण ठरेलअसा विश्वासही अन्न व औषध प्रशासन मंत्री झिरवाळ यांनी व्यक्त केला.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.