-ठिकठिकाणी स्वागत व प्रसादाची वितरण
कामठी ता प्र 8 :- श्री हरदुलाल बाबा देवस्थान व संत गजानन महाराज सेवा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने श्री गजानन महाराज प्रगट दिनाचे पर्वावर काढण्यात आलेल्या पायी पालखी मिरवणुकीने कामठी शहर दुमदुमले ठिकठिकाणी नागरिकांनी स्वागत करून प्रसादाचे वितरण केले महसूलमंत्री चंद्रशेखर तुप्पट , नगराध्यक्ष अजय अग्रवाल यांचे हस्ते पूजा अर्चना करून पालखी मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली.
याप्रसंगी देवराव तुप्पट, भाजपा शहर अध्यक्ष मंगेश यादव, कार्यक्रम आयोजन समितिचे अध्यक्ष चंद्रशेखर तुप्पट, राजेश खंडेलवाल, राजू तुप्पट, अनुप वंजारी, नरेश रेवतकर, गणेश सायरे, रोहित तुप्पट, दुर्गेश थोटे, गणेश तुप्पट, दिनेश बावनकर, दीपक रेवतकर, राज हाड़ौती, सुनील पाटिल, कपिल गायधने, रोशन तुप्पट, सुनील पमनानी, आशु अवस्थी, विजय कोंडुलवार, अथर्व पिगले, नितिन रावेकर, कृष्णा खंडेलवाल सहित अनेक गणमान्य नागरिक प्रमुख रूपाने उपस्थित होते।
बँड, ढोल, ताशे ,फटाके अतिशबाजी व भजन मंडळाच्या उपस्थितीत निघालेली पालखी मिरवणूक हरदास नगर ,हैदरी चौक ,मेन रोड ,चावडी चौक ,नेताजी चौक मच्छी पूल ,राम मंदिर, मोदी पढाव, मोंढा मार्गे नगर भ्रमण करीत बजरंग पार्क येथील गजानन महाराज मंदिरात पालखी मिरवणुकीचे समापन करण्यात आले पालखी मिरवणुकीचे ठिकठिकाणी नागरिकांनी स्वागत करून प्रसादाचे वितरण केले. मंदिरात दहीहंडी फोडून महाप्रसाद कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.या महाप्रसादाचा मोठ्या संख्येतील भाविकांनी आस्वाद घेतला.




