spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

“टाटा एसच्या धडकेत तरुण ठार; फरार चालकावर वरठी पोलिसांत गुन्हा”

हंसराज, प्रतिनिधी भंडारा वरठी :- भंडारा-नागपूर मार्गावरील मोहगाव देवी शिवारात ७ फेब्रुवारी रोजी दुपारी ०४.०० च्या सुमारास झालेल्या एका भीषण रस्ते अपघातात गोंदिया येथील २९ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला. दिगंबर तेजलाल तुरकर (रा. डोंगरगाव, जि. गोंदिया) असे मृतकाचे नाव आहे.

दिगंबर हा आपल्या दुचाकीने (क्र. MH 31 GB 5373) डोंगरगावहून नागपूरच्या दिशेने जात होता. दरम्यान, मोहगाव देवी शिवारात समोरून येणाऱ्या पांढऱ्या रंगाच्या टाटा एस (क्र. MH 36 F 2046) च्या चालकाने आपले वाहन हयगयीने व निष्काळजीपणे चालवून दुचाकीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, दिगंबर गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला.

अपघातानंतर आरोपी चालक घटनेची कोणतीही माहिती न देता घटनास्थळावरून पसार झाला. याप्रकरणी वरठी पोलिसांनी आरोपी चालकाविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम २८१, १०६(१) आणि मोटार वाहन कायद्याच्या कलम १३४, १८४ अन्वये गुन्हा नोंदवला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार खराबे हे करीत आहेत.

Popular Articles