spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

उत्तर नागपूरात रमाई जयंती निमित्त विजयी नगरसेवकांचा मोठ्या उत्साहात सत्कार सोहळा संपन्न

– लोकप्रतिनिधींना सामाजिक जबाबदारीची ठाम जाणीव

नागपूर :- माता रमाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त नॉर्थ नागपूर सिनीयर सिटिझन फोरम, नॉर्थ नागपूर महिला फोरम व युवा ग्रॅज्युएट फोरम यांच्या संयुक्त विद्यमाने उत्तर नागपूरातील विजयी नगरसेवक व नगरसेविका यांच्या सत्कार समारंभ रविवारी नागोराव पाटणकर बाल उद्यान व खुले रंगमंच, पाटणकर चौक येथे पार पडला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान दै. सकाळचे मुख्य संपादक प्रमोद काळबांडे यांनी भूषविले. सर्वप्रथम त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांच्या प्रतिमेला अध्यक्षाच्या हस्ते व नगरसेवक /नगरसेविका यांच्या उपस्थितीत माल्यार्पण करून व दिप प्रज्वलित करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन महिला फोरमच्या नंदिनी गौतम यांनी केली. तसेच उषा उके यांनी माता रमाई यांच्या त्याग, संयम व संघर्षमय जीवनाची आठवण करून देत लोकप्रतिनिधींनी सत्तेचा मान नव्हे तर जबाबदारी म्हणून स्वीकार करावा, असा स्पष्ट सामाजिक संदेश दिला.सिनीयर सिटिझन फोरमचे संयोजक नरेश साखरे यांनी सिनीयर सिटिझन फोरमची मुद्देसूद व सविस्तर माहिती तसेच कार्यक्रमाचे उद्देश आपल्या प्रास्ताविकात मांडले व उपस्थित नागरिकांना आवाहन करण्यात आले. या कार्यक्रमाला विविध राजकीय पक्षांचे विजयी नगरसेवक/नगरसेविका प्रभाग २ च्या भावना लोणारे, प्र.३ चे पवन कोये, अलीश फहीम खान, प्र.६ च्या रेखा पाटील, प्र.७ च्या कल्पना द्रोणकर, आसिफ सादिक शेख, हर्षला जैस्वाल, प्र. ९ चे विवेक निकोसे, गौतम अंबादे, प्रगती यादव उपस्थित होते. समाजाने मतदान करून दिलेला अधिकार हा केवळ पदासाठी नसून नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी आहे, याची जाणीव करून देण्यात आली.

लोकप्रतिनिधींनी केवळ निवडणुकीपुरते मर्यादित न राहता नागरिकांच्या पाणी, स्वच्छता, महिला सुरक्षा, रोजगार व मूलभूत सुविधा या प्रश्नांवर आपआपले प्रभागात ठोस भूमिका घ्यावी, असा ठाम विश्वास व्यक्त करीत सामाजिक संदेश देण्यात आला. यावेळी फोरमचे अश्विन बोरकर यांनी उत्तर नागपूरातील नगरसेवकांनी एकत्रितपणे आणि जबाबदारीने काम करावे या एकमेव उद्देशाने सर्व नगरसेवकांना उत्तर नागपूररांच्या मागण्यांचे पत्रक देण्यात आले आणि त्यांना विनंती करण्यात आली की या समस्यांना पुर्ण करण्यासाठी प्रयत्न करावे. उत्तर नागपूरला सुंदर आणि स्वच्छ नागपूर बनविण्यासाठी सहकार्य करण्याची ग्वाही निवडून आलेल्या नगरसेवकांनी याप्रसंगी दिली. जयंती साजरी करण्याचा हा अतिशय स्तुत्य उपक्रम आहे असे उपस्थित असलेल्या नागरिकांनी केला.उत्तर नागपूर परिसरातील मुलभूत सुविधा, प्रमुख रस्त्यावरील अतिक्रमणे, नागरिकांची सुरक्षा, पाणीटंचाई, स्वच्छता, झोपडपट्टी विकास, महिला सुरक्षा, तरुणांना रोजगार व मूलभूत सुविधा या प्रश्नांवर तातडीने व ठोस काम करण्याची अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली. लोकप्रतिनिधींनी पक्षीय मतभेद बाजूला ठेवून विकासासाठी एकत्र काम करणे ही काळाची गरज असल्याचे मत मांडण्यात आले. सत्कार समारंभात विजयी नगरसेवक व नगरसेविकांचा सत्कार केला. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमोद काळबांडे, फोरमचे नरेश कोटांगले, ॲड.मोरेश्वर मंडपे, महिला फोरमच्या माया बोंदाडे यांच्या हस्ते सविधानाची प्रास्तविका व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. यामध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सामाजिक बांधिलकीचा संदेश दिला. प्रमोद काळबांडे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणांमध्ये नॅार्थ नागपूर सिनीयर सिटिझन फोरमच्या कार्याची दखल घेऊन अश्या प्रकारच्या उपक्रम राबविण्यात येणारी एक आगळी वेगळी सामाजिक कार्य करणारी एकमेव संस्था आहे असे प्रतिपादन करून जेष्ठ नागरिकांनी यात पुढाकार घ्यावा असे आवाहन केले. कार्यक्रमाचे संचालन नंदिनी गौतम यांनी केले. शेवटी महिला फोरम तर्फे आयोजित रानमेवा महोत्सवात नागरिकांनी मोठ्या उत्साहात सहभागी होऊन या उपक्रमाचे कौतुक केले. तसेच महिला फोरमच्या माया बोंदाडे यांनी समारोपीय भाषणात आयोजकां च्यावतीने उपस्थित मान्यवर व नागरिकांचे आभार मानले. कार्यक्रम यशस्वीरित्या अजय गौतम, श्याम सनकाळे, श्रीधर मंडपे, मधुकर गौतम, विवेक निमगडे, अनिरुद्ध बोदेले, अशोक बोंदाडे, सिद्धार्थ रंगारी, हेमंत शिंगोडे, मोतीलाल नाईक, लक्ष्मीचंद कठाणे, मिलिंद रामटेके, विवेक निमगडे, सुरेंद्र रामटेके आणि महिला फोरमचे ऊषा जंगम, ऊषा वासनिक, बबिता सत्ते, दिपा सुखदेवे, हर्षिणी गौतम, नम्रता मोटघरे, गौतमी पानतावणे, कविता मंडपे, मीना उके, महानंदा बागडे, सरोज बोदेले, छाया मेश्राम व युवा ग्रॅज्युएट फोरमचे कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतलेत.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.