कामठी :- नागपूर जिल्ह्याचे उपनगर मानले जाणारे कामठी शहर हे मेट्रोचे शहर निर्मानाधीन होत असून शहरातून मेट्रो प्रकल्पाचे काम प्रगती पथावर आहे. कामठी शहराचा विकासात्मक चेहरा मोहरा बदलवण्यासाठी कामठी शहरातून अतिक्रमण कारवाही नियोजित आहे . कामठी शहरातून जाणारा नागपूर जबलपूर महामार्ग हा 18 मीटर रुंदीकरणाचा होणार आहे त्यासाठी या रस्त्याच्या कडेला असलेल्या अतिक्रमणचे सीमांकन करण्यात आले दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभाग ,कामठी तहसील प्रशासन विभाग, भूमि अभिलेख विभाग तसेच कामठी नगर परिषद प्रशासन विभागाने मागील सहा महिन्यापूर्वी सदर अतिक्रमन जागेची संयुक्त पाहनी करून 18 मीटर ची सीमांकन मोजणी करण्यात आली होती मात्र त्यानंतर पावसाळा, नगर परिषद निवडणुकीमुळे या अतिक्रमण कार्यवाहिला स्थगिती देण्यात आली होती मात्र आता या प्रस्तावित कामाला गती देण्यासाठी अतिक्रमण धारकांनि स्वेच्छेने अतिक्रमण काढून शहराच्या विकासासाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे व प्रशासनाने 18 मीटर च्या प्रस्तावित रस्ता बांधकामासाठी अतिक्रमण करवाहिला गती द्यावे असे मौखिक आदेश जिल्हाधिकारी विपीन इटनकर यांनी आज 9 फेब्रुवारीला कामठी महामार्गावरील मोटर स्टँड चौक ते पोलीस लाईन चौक पर्यंत प्रत्यक्ष पायदळ पाहणी करतेवेळी केले व अतिक्रमण काऱ्याशी खुद्द भेट घालून स्वेच्छेने अतिक्रमन काढण्याचे निर्देर्शीत केले.
कामठी शहरातून जाणारा नागपूर जबलपूर जुना राष्ट्रीय महामार्ग क्र 44 हा 18 मीटर रुंदीचा करण्यात येणार आहे .ज्यामुळे कामठी शहरात होणाऱ्या सतत च्या वाहतूक कोंडीवर तोडगा निघणार असून शहराच्या विकासाला गती मिळणार आहे त्यानुसार पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनार्थ जिल्हाधिकारी विपीन इटनकर,मुख्याधिकारी विनोद जाधव , मेट्रो प्रकल्प विभाग,सार्वजनिक बांधकाम विभाग ,राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभाग ,तहसील प्रशासन,भूमी अभिलेख तसेच नगर परिषद प्रशासनाने आज जयस्तंभ चौक ते वारीसपुरा पुलियापर्यंत संयुक्त सीमांकन पाहणी करीत अतिक्रमनधार्यांना अतिक्रमण काढण्याचे निर्देशित केले.यामध्ये 1911 च्या सर्व्हेनुसार कामठी शहरातून जाणारा नागपूर जबलपूर राष्ट्रीय महामार्ग हा मूळ 18 मीटर चा रुंदीकरण होनार आहे त्यात अडसर ठरणारे अतिक्रमन काढण्यात येणार असून .हे संयुक्त सीमांकन करतेवेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी पराग ठमके , राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाचे अधिकारी, नगर परिषदचे प्रदीप भोकरे,रुपेश जैस्वाल आदि अधिकारी व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.








