– ४० वर्षानंतर डी एड माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येत जुन्या आठवणीला दिला उजाळा
कन्हान :- स्व. बिनाबाई माहुरे डी. एड कॉलेज स्टेशन रोड कन्हान येथिल डी एड प्रथम बँच १९८४-८६ च्या माजी विद्यार्थ्यांनी ४० वर्षानंतर एकत्र येत जुन्या आठ वणीला उजाळा देत कौटुंबिक स्नेहसंमेलन थाटात संपन्न केले.
सोमवार (दि.९) फेब्रुवारी २०२६ ला कृष्णराव लॉन तारसा रोड कन्हान येथे बिनाबाई माहुरे डी. एड कॉलेज स्टेशन रोड कन्हान येथिल डी एड प्रथम बँच १९८४-८६ च्या माजी विद्यार्थ्यांचे कौटुंबिक स्नेहसंमे लनाचे उद्घाटन इंदिरा गांधी कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचाय बनकर यांचे अध्यक्षेत तर माजी सभापती देवराव माहुरे यांचे हस्ते करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणुन बाबुराव बांते, प्रकाश नाईक, छाया नाईक, वासुदेव चिकटे, मनोहरराव कोल्हे, मुख्याध्यापक प्रविणकुमार साबळे, व आगाशे आदी प्रामुख्याने उपस्थित होते. उपस्थित सर्व मान्यवरांचे शेख व शेख हयानी स्वागत गिताने स्वागत केले. प्रास्ताविकातुन गुंडेराव ठाकरे यांनी कार्यक्रमाची भुमिका ठेवत जुन्या आठवणीला उजाळा दिला. तदंतर सर्व माजी विद्यार्थ्यांनी ४० वर्षा नंतर भेटीत आपला परिचय देऊन आपआपले सुख, दु:खाचे अनुभव व्यकत केले. सर्व मान्यवर आणि माजी विद्यार्थ्याना शाल, श्रीफळ, स्मृतीचिन्ह व पुष्प वृक्ष देऊन सत्कार करण्यात आला. सर्व माजी विद्यार्थ्यांनी कौटुंबिक उपस्थित राहुन सह कुटुंब स्नेह भोजन करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रमाचे सुत्र संचालन लता मदने यानी तर आभार दिपक टुले यानी मानले. कार्यक्रमाच्या यशस्विते करिता छापानी मोहन, पुंडलिक राघोर्ते, कृष्णा आगाशे, गोविंदा किरपाने, प्रभाकर ठाकरे, दिलीपसिंग बागडी, गौतम ठवरे, सुधाकर मस्की, सुधाकर भोयर, राजेंद्र वाहणे, किसन टीकम, विद्या माहुरे, प्रभा झाडे, अल्का गिरडकर, प्रमिला दुधपचारे, जयश्री बावनकर सह सर्व माजी विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.




