spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

विभागीय आयुक्त कार्यालयात ‘मराठी भाषा पंधरवडा’ साजरा

– विविध स्पर्धांचे आयोजन आणि उत्स्फूर्त सहभाग

नागपूर :- विभागीय आयुक्त कार्यालयात आज विविध स्पर्धांचे आयोजन करून मराठी भाषा पंधरवडा साजरा झाला. या कार्यक्रमात विविध शासकीय कार्यालयांचे अधिकारी-कर्मचारी उत्स्फूर्तपणे सहभागी झाले.

आयुक्तालयातील सभागृहात आयोजित या कार्यक्रमाचे उद्घाटन अपरआयुक्त सामान्य प्रशासन तेजुसिंग पवार यांच्या हस्ते झाले. महसूल अपर आयुक्त राजेश खवले, रो.ह.यो. सहआयुक्त अविनाश हदगल, मागासवर्ग कक्षाच्या उपायुक्त डॉ. हंसा मोहने उपस्थित होत्या.

कार्यक्रमाच्या संयोजक तथा सहायक आयुक्त भूसुधार शिल्पा सोनुले, स्पर्धेचे परीक्षक अध्यापक महाविद्यालयाचे प्रा.डॉ. शैलेश गायकवाड, बाया कर्वे होकेशनल ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या प्राध्यापक अश्विनी बुजोणे, महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या स्कूल ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी चे प्रा.डॉ.प्रवीण गेडाम यावेळी उपस्थित होते.

राठोड आणि खवले यांनी मराठी भाषेला मिळालेला अभिजात भाषेचा दर्जा, मराठीतील विविध भाषा व्यवहार आणि मराठीच्या संवर्धनासाठी आवश्यक प्रयत्न याबाबत विचार मांडले.

मराठी भाषेच्या महत्वावर आधारित निबंध लेखन स्पर्धा, शासनस्तराहून राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांवर आधारित चारोळी व घोषवाक्य स्पर्धा, शब्दकोडे आणि कविता वाचन स्पर्धा यावेळी घेण्यात आल्या. विभागीय आयुक्तालयातील विविध विभाग, संचालक माहिती व जनसंपर्कम महासंचालनालय, लेखा व कोषागारे,नागरी हक्क संरक्षण, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, पोलीस,वने,सार्वजनिक बांधकाम आदी विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी या स्पर्धांमध्ये सहभाग घेतला.कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र गीताने झाली. शिल्पा सोनुले यांनी सूत्रसंचालन केले व आभार मानले. लवकरच स्पर्धेचा निकाल जाहीर होणार असून बक्षीस वितरण होईल.

Popular Articles