spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

भारताला महासत्ता बनविण्यासाठी, भारतातील प्रत्येक कुटुंबाला आत्मनिर्भर बनवावे लागेल – आचार्य खामनीकर

– अरोली येथे सुरू असलेल्या 40 दिवसीय श्री ब्रह्मविद्या निरूपण सोहळ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद 

किशोर साहू, मौदा ता. 11:- अरोली येथे श्रीदत्त मंदिर  पंचकमिटी, उपदेशी मंडळी व ग्रामस्थांतर्फे मंगळवार ता. 13 जानेवारी ते ता.22 फरवरी पर्यंत चाळीस दिवसीय श्री ब्रह्मविद्या निरूपण सोहळा सुरू आहे. या सोहळ्यात उपस्थितांना जि. अहिल्यानगर ता. श्रीरामपूर मधील माळवाडगाव येथील ज्ञानगंगा, ज्ञानदीप, ज्ञानयोगी, ज्ञानपूज्य ब्रह्मविद्येचे अक्षोभ्य उदक ,निरापेक्ष, निस्पृह, निरालंबी, निरहंकार ,आधारस्तंभ, आचरणशील , सुहृदय, संयमी, त्रिदंडीयुक्त ,तपस्वी आचार्य प्रवर महंत श्रीहंसराजदादा खामणीकर मार्गदर्शन करीत आहे. ते प्रेरणादायी मार्गदर्शन करताना सांगत आहेत की, भारतातील प्रत्येक कुटुंब व्यसनमुक्त झाले तर प्रत्येक कुटुंब आत्मनिर्भर बनेल व प्रत्येक कुटुंब आत्मनिर्भर झाल्यास भारत महासत्ता बनणार. यासाठीच महानुभाव पंथातर्फे पावसाळ्याचे चार महिने सोडून उर्वरित आठ महिने गावागावात जाऊन मागील आठशे वर्षांपूर्वीपासून ब्रह्मविद्या निरूपण सोहळे आयोजित करीत आहे.

या सोहळ्याला माजी आमदार टेकचंद सावरकर, शिवसेना तालुकाध्यक्ष प्रशांत भुरे, भाजपा कोदामेंढी जि प सर्कल क्लस्टर प्रमुख भगवान बावनकुळे, अरोली पं स सर्कल प्रमुख रोशन उमप सह गावातील, परिसरातील, तालुक्यातील, जिल्ह्यातील सामाजिक व राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर मंडळी भेटी देत असून या सोहळ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.

या सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी अरोली येथील सर्वज्ञ राईस मिलचे मालक सुधीर यावलकर ,संदीप वाघ, प्रशांत पठाडे, कमलेश उमप, अतुल उमप,वासुदेव कुबडे सह समस्त अरोलीवासी सहकार्य करीत आहे.

Popular Articles