spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

खापा नगर परिषदेत मुख्याधिकारी सचिन राऊत यांच्या आगमनाने विकास कामांना वेग

खापा, वार्ताहर :- वरणगाव नगर परिषद, जि. जळगाव येथून बदली होऊन खापा नगर परिषदेत मुख्याधिकारी म्हणून रुजू झालेले सचिन राऊत यांनी पदभार स्वीकारताच शहरातील विकास कामांना गती दिली आहे. त्यांच्या येण्याबरोबरच प्रलंबित कामे मार्गी लावण्यावर भर देत, विविध मूलभूत सुविधांच्या कामांना सुरुवात करण्यात आली आहे.

शहरातील रस्ते दुरुस्ती, स्वच्छता मोहिम, पाणीपुरवठा व्यवस्था सुधारणा, नालीसफाई तसेच सार्वजनिक ठिकाणांच्या सुशोभीकरणास प्राधान्य देत नागरिकांच्या समस्या तत्परतेने सोडविण्याचे काम त्यांनी हाती घेतले आहे. प्रशासनातील शिस्त, पारदर्शकता व नियमाअंतर्गत कामकाज यावर विशेष भर देत, त्यांनी कर्मचाऱ्यांमध्येही सकारात्मक कार्यसंस्कृती निर्माण केली आहे.

राऊत हे अनुभवी, तरुण व कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळखले जात असून, यापूर्वी वरणगाव नगर परिषदेत त्यांनी विविध विकास कामे यशस्वीपणे पूर्ण केली होती. त्याच धर्तीवर खापा शहराच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी नियोजनबद्ध पद्धतीने कामाला सुरुवात केली आहे.

नागरिकांच्या अडचणी ऐकून तत्काळ कार्यवाही करणे, कार्यालयीन कामकाज वेळेत पूर्ण करणे आणि शासनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणे. यामुळे अल्पावधीतच ते नागरिकांमध्ये लोकप्रिय झाले आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली खापा शहराच्या विकासाला नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

Popular Articles