spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

बी.आर.ओ.मध्ये शासकीय आयटीआय च्या नागपूरच्या पाच प्रशिक्षणार्थ्यांची यशस्वी भरती

नागपूर :- संत जगनाडे महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) नागपूर येथील बिल्डिंग कन्स्ट्रक्शन व्यवसायातील पाच प्रशिक्षणार्थ्यांची बॉर्डर रोड्स ऑर्गनायझेशन (बी.आर.ओ.) या प्रतिष्ठित शासकीय संस्थेत यशस्वी निवड झाली आहे. निवड झालेल्या प्रशिक्षणार्थ्यां मध्ये प्रमोद बाबुराव भोयर, रोहित प्रमोद मिराशे, मिलिंद उदेभान भिओगाडे, अक्षय बालकृष्ण जंजाळ व एसाकी अरुमुगमपांडी तेवर यांचा समावेश आहे. या यशा मागे क्राफ्ट इन्स्ट्रक्टर इंद्रभूषण बेलसरे व प्रभाकर मुंडे यांचे विशेष परिश्रम कारणीभूत ठरले. तसेच उपसंचालिका श्वेता कुलकर्णी, उपप्राचार्य किशोरी पंडिले व जयंत टालाटुले गटनिर्देशक व अविनाश केने गटनिदेशक यांनी दिलेले मार्गदर्शन मोलाचे ठरले. बिल्डिंग कन्स्ट्रक्शन व्यवसायातून शासकीय व खासगी क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर संधी उपलब्ध आहे. ज्यामध्ये लार्सन व टुब्रो विविध शासकीय संस्था तसेच बी आर ओ जलसंधारण यासारख्या तसेच वेगवेगळ्या प्रायव्हेट संस्था व कंपन्या यामध्ये सुद्धा तसेच स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी सुद्धा वेगवेगळ्या संधी उपलब्ध आहेत. या संधीचा लाभ सर्वांनी घ्यावा, असे आवाहन उपसंचालिकां यांनी केलेले आहे.

Popular Articles