नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या वतीने ‘एकात्म मानव दर्शन’ अंत्योदयचे प्रणेते भारतीय संस्कृतीचे गाढे अभ्यासक पंडित दीनदयाल उपाध्याय आणि थोर देशभक्त, प्रसिद्ध उद्योगपती जमनालाल बजाज यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले.
मनपाच्या उपमहापौर लिला हाथीबेड व अतिरिक्त आयुक्त (प्रभारी आयुक्त) वसुमना पंत यांच्या हस्ते मनपा मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीच्या दालनात स्थित पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या तैलचित्राला माल्यार्पण करीत अभिवादन करण्यात आले.

याप्रसंगी मनपाचे उपायुक्त निर्भय जैन, राजेश भगत, मंगेश खवले, कार्यकारी अभियंता राजेंद्र राठोड, जनसंपर्क अधिकारी मनीष सोनी, अमोल तपासे, जितेश धकाते, सुधीर कोठे, प्रमोद बराई यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. तत्पूर्वी उपमहापौर लिला हाथीबेड यांनी बजाज नगर चौक स्थित जमनालाल बजाज यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन केले. यावेळी मनपाचे कर्मचारी व अग्निशमन जवान उपस्थित होते.








