spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

पंडीत दीनदयाल उपाध्याय यांच्या पुण्यतिथी निमित्त भाजप प्रदेश उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम यांनी वाहिली श्रद्धांजली

नागपूर :- जनसंघाचे संस्थापक, एकात्म मानव वादाचे प्रणेते पंडीत दीनदयाल उपाध्याय यांच्या पुण्यतिथीनिमित्त भारतीय जनता पार्टी प्रदेश उपाध्यक्ष ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी बुधवारी 11 फेब्रुवारी रोजी पं. दीनदयाल उपाध्याय यांच्या तैलचित्राला पुष्पहार अर्पण करुन वंदन केले.

यावेळी भाजपा वाठोडा मंडळ अध्यक्ष राजू गोतमारे, वाठोडा मंडळ महामंत्री सुधीर दुबे, वाठोडा महिला मंडळ अध्यक्ष कल्पना सर्वे, वाठोडा महिला मंडळ महामंत्री सिंधू पराते, पालक प्रभाग विक्रम खुराणा, वॉर्ड अध्यक्ष सुनील आग्रे, सचिन भगत, वार्ड महिला अध्यक्ष ज्योति वाघमारे, छाया गुज़्जेवार, युवा वार्ड अध्यक्ष विनय गुप्ता बूथप्रमुख किशोर सायगन, कुशाल वेड़ेकर, रामचरण बहनिया, रवि धांडे, भूपेश अंधारे, अश्विन कुंभारे, श्याम सामंत, विक्रम डुंबरे, कपिल वासनिक, हरीश टेंभारे, प्रमोद श्रीवास, मनोज सपकाळ, कविता हत्तीमारे, सूर्यमाला राठोड, वनिता कामडे, सीमा दुरुगकर आदी उपस्थित होते.

पंडीत दीनदयाल उपाध्याय यांनी समाजातील गरीब आणि कमकुवत व्यक्तींच्या विकासातूनच खरा विकास साध्य होणार असल्याची संकल्पना मांडली. त्यांच्या विचारांचा आदर्श घेत केंद्रामध्ये नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील भारतीय जनता पार्टीच्या सरकाने देशातील तळागाळातील, कमकुवत शेवटच्या व्यक्तीच्या उत्थानासाठी अनेक योजनांचा आधार निर्माण केला आहे. त्यामुळे आणि ग्रामिण भागातील व्यक्ती समाजाच्या मुख्य प्रवाहात येत आहेत, असे मत यावेळी ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी व्यक्त केले.

Popular Articles