spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

सुरांच्या रुहानी मैफलीची आज मेजवानी

-‘राहुल देशपांडे कलेक्टिव्ह’चा नागपुरात रंगणार जल्लोष

– मुख्यमंत्री महाकरंडक ट्रॉफी वितरण सोहळाही ठरणार आकर्षण

नागपूर :- शहरातील संगीतप्रेमींसाठी आज सुरांची खास मेजवानी सजणार आहे. श्री सिद्धिविनायक सेवा ट्रस्ट यांच्या वतीने सुप्रसिद्ध गायक राहुल देशपांडे आणि गायिका प्रियंका बर्वे यांच्या ‘राहुल देशपांडे कलेक्टिव्ह’ या बहुप्रतीक्षित संगीत कार्यक्रमाचे आयोजन आज (ता. १४) सायंकाळी ६ वाजता लक्ष्मीनगर व्हॉलीबॉल ग्राउंड, नागपूर येथे करण्यात आले आहे.

“दिल से दिल तक… एक रुहानी शाम…” या संकल्पनेवर आधारित हा कार्यक्रम सूफी आणि लोकप्रिय हिंदी गीतांच्या सादरीकरणातून रसिकांना मंत्रमुग्ध करणार आहे. भावस्पर्शी शब्द, सुरेल आवाज आणि उत्कृष्ट सादरीकरण यांची संगत अनुभवण्याची संधी नागपूरकरांना लाभणार आहे. विशेष म्हणजे, या कार्यक्रमासाठी प्रवेश सर्वांसाठी विनामूल्य ठेवण्यात आला आहे.

या संगीतमय सोहळ्यात मुख्यमंत्री महाकरंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेतील विजेत्या संघांचा ट्रॉफी वितरण समारंभही पार पडणार आहे. आमदार संदीप जोशी यांच्या संकल्पनेतून नोव्हेंबर २०२५ मध्ये या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. विजेत्यांना यापूर्वी रोख पारितोषिके व वैयक्तिक पुरस्कार प्रदान करण्यात आले असून, आज ट्रॉफी प्रदान करून त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमाला आमदार संदीप जोशी, नवनिर्वाचित महापौर नीता ठाकरे तसेच जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

संगीत आणि संस्कृतीचा संगम अनुभवण्यासाठी नागपूरकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Popular Articles