spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

नियमित कर्जदार शेतकऱ्यांना ५० हजारांऐवजी १ लाखाची प्रोत्साहन राशी द्या; डॉ. हरेंद्र रहांगडाले यांची मागणी

– कर्जमाफीचे निकष शिथिल करून थकीत शेतकऱ्यांनाही दिलासा देण्याचे मुख्यमंत्र्यांना साकडे.

हंसराज,प्रतिनिधी भंडारा तुमसर :- राज्यातील कर्जमाफी योजनेअंतर्गत नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना मिळणारी ५० हजार रुपयांची प्रोत्साहन पर राशी वाढवून ती १ लाख रुपये करण्यात यावी, तसेच जून २०२६ मध्ये होणाऱ्या कर्जमाफीचे निकष शिथिल करण्यात यावेत, अशी आग्रही मागणी भाजप जिल्हा उपाध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक डॉ. हरेंद्र रहांगडाले यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे निवेदन पाठवले आहे.

या निवेदनाच्या प्रती राज्याचे अर्थ व नियोजन मंत्री, भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री, आमदार परिणय फुके, तुमसर-मोहाडी विधानसभा क्षेत्राचे आमदार राजू कारेमोरे आणि सहाय्यक निबंधक सहकारी संस्था, तुमसर यांनाही माहिती व कार्यवाहीसाठी देण्यात आल्या आहेत.

२०१९ च्या धर्तीवर निकषांमध्ये सुधारणेची मागणी

डॉ. रहांगडाले यांनी निवेदनात नमूद केले आहे की, सन २०१९ मध्ये झालेल्या कर्जमाफीमध्ये नियमित कर्ज भरणाऱ्या आणि सलग ३ वर्षे परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये प्रोत्साहन राशी देण्यात आली होती. याच धर्तीवर सन २०२६ मध्ये दिल्या जाणाऱ्या प्रोत्साहन राशीसाठी सुद्धा नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना ३ वर्षांची अट लावण्यात यावी. मात्र, वाढती महागाई आणि शेतीचा खर्च पाहता, ही राशी ५० हजार रुपयांऐवजी १ लक्ष रुपये करण्यात यावी.

केवळ नियमित कर्जदारच नव्हे, तर सन २००८, २०१६ आणि २०१९ मधील जे शेतकरी विविध कारणांमुळे थकीत राहिले आहेत, अशा सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात यावी, अशी मागणीही डॉ. रहांगडाले यांनी केली आहे. सहकारी संस्थांचे अर्थचक्र हे नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांच्या जिवावरच अवलंबून असते. त्यामुळे प्रामाणिकपणे कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांचा सन्मान म्हणून त्यांना १ लाख रुपये प्रोत्साहन राशी मिळणे अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी निवेदनात म्हटले आहे.

शेतकऱ्यांच्या हितासाठी शासनाने या मागण्यांचा सकारात्मक विचार करून आगामी कर्जमाफी योजनेत योग्य बदल करावेत, अशी अपेक्षा डॉ. हरेंद्र रहांगडाले यांनी व्यक्त केली आहे.

Popular Articles