किशोर साहू, मौदा :- शनिवार (ता.28 फेब्रुवारी) ला प्रनाग हायस्कूल आजनगाव येथे विज्ञान शिक्षक गुणरत्न गजभिये यांच्या संकल्पनेतून विद्यार्थ्यांनी विविध सादरीकरण जसे वैज्ञानिक साहित्य, शैक्षणिक साहित्य, पोस्टर, वैज्ञानिक प्रकल्प सह निबंध व विषयासंबंधी भाषणे, तसेच माहितीपट सादर करून राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा केला .
यासाठी वर्ग 8 वी च्या विद्यार्थ्यांनी विशेष मेहनत घेतली, उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन कार्यक्रम यशस्वी केला. कार्यक्रमास शाळेच्या मुख्याध्यापिका एस. एम. बाबुलकर, विज्ञान शिक्षक गुणरत्न गजभिये, सहाय्यक शिक्षक सुरेश टांगले, राजू गेडाम उपस्थित होते. त्यांनी विज्ञान दिवसावर विद्यार्थ्यांना अत्यंत उपयुक्त मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे नियोजन विद्यार्थ्यांनीच केले. सुत्रसंचलन आरूषी भोयर व आभार शेजल बांते यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी लिपिक सुनील डोंगरे, परीचर डोंगरे यांचे सहकार्य लाभले.








