spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

अवैधरित्या देशी दारू वाहतुक करणाऱ्या आरोपी विरूद्ध गुन्हा दाखल

– ५४ हजार रूपयाचा मुद्देमाल जप्त, कन्हान पोलीसांची कामगिरी

कन्हान :- पोलीस स्टेशन अंतर्गत आबेंडकर चौकातुन हिरो होंडा डीलक्स दुचाकीने अवैधरीत्या देशी दारूची वाहतुक करताना एका आरोपीस पडकडुन त्यांच्या ताब्यातुन दुचाकीसह ५४ हजार रूपयाचा मुद्देमाल जप्त आरोपी विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रविवार (दि.०१) मार्च २०२६ ला कन्हान पोलीसांना गुप्त बातमीदारांकडुन खात्रीशीर माहीती मिळाली की, मोटरसायकलने अवैधरीत्या देशी दारूची वाहतुक केली जात आहे. प्राप्त माहीतीनुसार पोलीसांनी तात्काळ आंबेडकर चौक येथे नाकाबंदी केली असता नाकाबंदी दरम्यान हिरो होंडा एच.एफ डिलक्स मोटारसायकल क्र. एम.एच ४० आर ४४९६ ही मिळुन आली. वाहन थांबवुन वाहनाची पंचासमक्ष पाहणी केली असता आरोपीच्या जवळ असलेल्या खोक्यात देशी दारू मिळुन आली. आरोपी विशोद विश्वेश्वर पात्रे वय २५ वर्ष, रा. वाघधरेवाडी कन्हान हा अवैधरीत्या देशी दारूची वाहतुक करतांना मिळुन आला. पोलीसांनी पंचासमक्ष १) देशी दारूच्या १०० निपा किंमत ४०००/- रूपये, २) एक हिरो होंडा एच. एफ डिलक्स मोटार सायकल क्र. एम. एच ४० आर ४४९६ किंमत ५०,०००/- रूपये असा एकुण ५४,०००/- रुपयांचा मुददेमाल जप्त करून आरोपी विरूध्द पोलीस स्टेशन कन्हान येथे महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Popular Articles