spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

आज कन्हान ते शिर्डी पालखी पदयात्रेचे प्रस्थान

– श्रीराम नवमी निमित्य २१ दिवसाची कन्हान ते शिर्डी श्री साई पालखी पदयात्रा

कन्हान :- स्थानिक इंदिरा नगर येथील श्री साई मंदी रातुन श्री साईराम पालखी सोहळा समिती कन्हान व्दारे श्री रामनवमी उत्सवा निमित्य कन्हान ते शिर्डी श्री साई पालखी पदयात्रेचे प्रस्थान होणार आहे.

गुरूवार (दि.५) मार्च २०२६ सकाळी ९ वाजता दरवर्षी प्रमाणे १६ व्या वर्षी श्री रामनवमी उत्सवा निमित्य श्री साईराम पालखी सोहळा समिती कन्हान व्दारे श्री साई मंदीर इंदिरा नगर कन्हान येथे अभिषेक, पुजा, अर्चना करून अजय ठाकरे, साई ठाकरे, भार्गव ठाकरे, शकुंतला ठाकरे, रूपाली ठाकरे, ज्योती ठाकरे, रिधम वानखेडे यांच्या मार्फत भोजनदानासह कन्हान ते शिर्डी पालखी पदयात्रा भजन-पूजनासह तारसा रोड ने संत तुकाराम महाराज मंदीर तुकाराम नगर कन्हान येथे जगतगुरू संत तुकाराम महाराज बीज कार्यक्रमां तर्गत संत तुकाराम महाराजांना अभिवादन करून दुपारी १ वाजता तारसा रोड ने छत्रपती शिवाजी महा राज चौक जे.एन रोड कन्हान येथुन कामठी मार्गे नाग पुरकडे प्रस्थान करेल. ही २१ दिवसांची पालखी पद यात्रा विविध गावांना भेट देत दि.२५ मार्च ला सायंकाळी सुनिल लक्ष्मण भाबड यांचे निवासस्थानी मु. जेऊर कुंभारी ता. कोपरगाव जि. अहमदनगर येथे मुक्काम. गुरूवार दि.२६ मार्च ला श्री साई पालखी निवारा निम गाव येथुन भव्य मिरवणुक खंडोबा मंदीर ते समाधी मंदीर शिर्डी येथे श्री राम जन्म उत्सव सोहळा प्रारंभ. सायंकाळी श्री साई पालखी पदयात्रा शिर्डी ते कन्हान परतीकरिता प्रस्थान.

कन्हान ते शिर्डी श्री साई पालखी पदयात्रेच्या यशस्वितेकरिता मनोज चिकटे, अजय ठाकरे,अविनाश रायपुरे, गणेश हटवार, गौरव गिरडकर, बंटी डाफ, अज य शेंदरे, प्रमोद काकडे, करण तेलोते, रेहाण खडसे सह श्री साईराम पालखी सोहळा समिती कन्हान चे सर्व भाविक भक्त मंडळी परिश्रम करित सहकार्य करित आहे.

Popular Articles