spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

राजोली येथील नवयुवक मित्र मंडळाने गळ्यात ढोलकी, अंगात नवीन सदरा घालून, तर चाचेर येथील युवकांनी अंगातील सदरे काढून, मौदा तालुक्यातील इतरही गावात वेगवेगळ्या पद्धतीने होळीचा धुलीवंदनाचा सण उत्साहात केला साजरा

किशोर साहू, मौदा :- मंगळवार (ता.3 मार्च ) ला सकाळपासूनच होळीचा धुलीवंदनाचा सण मौदा तालुक्यातील गावागावात बाल गोपाला पासून तर वृद्धांपर्यंत वेगवेगळ्या मनोरंजनाच्या साधनाचा वापर करत एकमेकाला गुलाल व रंग लावत मोठ्या उत्साहात साजरा केला. कुंभारी येथील लहान मुलांनी लहान मुलांचे साहित्य वाजवत व एकमेकांना रंग लावत, तारसा येथे गावातील मुख्य रस्त्यावरून बँड पार्टी लावून मिरवणूक काढून, येसंबा येथे भजन मंडळीद्वारे घरोघरी जाऊन भजने गीते गाऊन, नांदगाव व तारसा फाटा येथे डीजे लावून, रेवराल येथे टाक्याच्या व नळाच्या पाण्याने, हिवरा येथील युवकांनी चक्क रस्त्याच्या चिखल एकमेकांना लावून,राजोली येथील नवयुवक मित्र मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी अंगात नवीन सदरे घालून व गळ्यात ढोलकी लावून तर चाचेर येथे युवकांनी अंगातील सदरे काढून धुलीवंदनाच्या सण आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा केला.

राजोली येथील नवयुवक मित्र मंडळाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये भावी सरपंच रवि पोटभरे,आयुष पोटभरे,चेतन आंबीलढुके,अजय श्रावणकर ,पीयूष पोटभरे,रोहित भंनारे,वैभव श्रावणकर,दुर्गेश सरोदे, गणेश श्रावणकर,संजय श्रावणकर ,निखील श्रावणकर यांच्या समावेश आहे.

Popular Articles