– 2000 महिलांमधून 75 फाइनलिस्टमध्ये निवड क्राऊन आणि सर्टिफिकेटने सन्मानित
कामठी :- नागपूरजवळील कामठी या छोट्या शहरातून आलेल्या वैशाली खोब्रागडे यांनी आपल्या जिद्द, आत्मविश्वास आणि संघर्षाच्या बळावर (व्हॉगस्टार फॅशन शो) च्या राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय यश संपादन केले आहे. एक विधवा म्हणून आयुष्याच्या कठीण टप्प्यातून जात असताना त्यांनी पतीच्या पश्चात अनेक सामाजिक, मानसिक आणि आर्थिक आव्हानांचा सामना करत, मुलं यांच्या पाठींबा व प्रेरणेने हे यश संपादन केले.
मुलांचा पाठिंबा, प्रेरणा व मदतीने कुठेही जास्त गवगवा न करता घरच्या घरीच त्यांनी या स्पर्धेसाठीची तयारी केली आणि नुकत्याच जयपूर येथे पार पडलेल्या National Level Vogue Star Fashion Show च्या राष्ट्रीय स्तरावर पोहोचल्या. या स्पर्धेत संपूर्ण भारत भरातून विविध क्षेत्रातील 2000 महिला सहभागी झाल्या होत्या. या 2000 महिलांमधून 40+ वयोगटासाठी केवळ 25 महिलांना अंतिम टप्प्यासाठी (फायनालिस्ट) निवडण्यात आले त्यात त्यांची एक सर्वसाधारण गृहीणी असुनही निवड झाली.
स्पर्धेतील Introduction, Talent, Fashion, Pageant आणि प्रश्नोत्तरे या 5 टप्प्यातील आव्हाने पेलत सर्व टप्प्यांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत त्या अंतिम राऊंडपर्यंत पोहोचल्या. या यशाबद्दल त्यांना Finalist म्हणून क्राऊन ने अलंकृत करत सर्टिफिकेट प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
स्पर्धेपूर्वी 3 दिवस सुपर मॉडेल Kavita Khairayat आणि रनवे कोच Sunny Kamble यांचे Runway Walk चे प्रशिक्षण मिळाले. तसेच National आणि International Level Mentors कडून Speech Delivery, Yoga, Walk, Food Discipline, Positive Affirmations यांचे 5 महिन्यांचे प्रशिक्षण त्यांनी पूर्ण केले.
ही कामगिरी केवळ वैयक्तिक यश नसून ग्रामीण/लहान भागातील आणि विशेषतः विधवा महिलांसाठी एक प्रेरणादायी उदाहरण ठरली आहे. आज वैशाली खोब्रागडे विधवा महिलांचे नेतृत्व करत त्यांना आत्मनिर्भर आणि आत्मविश्वासी बनवण्याचे कार्य करत आहेत. “आई, गृहीणी किंवा विधवा-कोणतीही ओळख स्त्रीची मर्यादा नसते.” आत्मविश्वास आणि जिद्द असेल तर राष्ट्रीय स्तरावरही यश मिळवता येते,” तसेच विधवा असणे हा कोणताही अंत नाही तर नवीन आयुष्याचीही सुरवात होउ शकते, असेही त्या ठामपणे सांगतात. वैशाली खोब्रागडे यांच्यामुळे कामठीच्या मातीतून राष्ट्रीय मंचावर झळकलेली ही कामगिरी अनेक महिलांसाठी आशेचा किरण ठरणार आहे.




