spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

भंडारा जिल्ह्यात १० वीचा हिंदीचा पेपर सुरळीत; १३,९२३ विद्यार्थ्यांची उपस्थिती, कुठेही गैरप्रकार नाही

हंसराज,प्रतिनिधी भंडारा :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने आयोजित फेब्रुवारी-मार्च २०२६ च्या परीक्षेंतर्गत आज पार पडलेला इयत्ता दहावीचा हिंदी विषयाचा पेपर भंडारा जिल्ह्यात शांततेत आणि सुरळीत पार पडला. जिल्हा परिषद शिक्षण विभाग (माध्यमिक) कडून मिळालेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील ९ परीक्षा केंद्रांवरून एकूण १३ हजार ९२३ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली, तर २१४ विद्यार्थी गैरहजर राहिले. विशेष म्हणजे, संपूर्ण जिल्ह्यात कुठेही कॉपी किंवा गैरप्रकार घडल्याची नोंद झाली नाही.

आज सकाळी ११ ते २ या सत्रात पार पडलेल्या हिंदी विषयाच्या परीक्षेसाठी जिल्ह्यात एकूण १४ हजार १३७ विद्यार्थी प्रविष्ठ होते. त्यापैकी १३ हजार ९२३ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यामध्ये भंडारा येथील लाल बहादूर शास्त्री विद्यालयाच्या दोन केंद्रांवरून सर्वाधिक ३,३०१ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. तालुकानिहाय विचार करता तुमसर (२०२७), साकोली (१६०१), लाखनी (१६०९), पवनी (१८७१), लाखांदूर (१५४३), मोहाडी (१४०८) आणि गोबरवाही केंद्रावर ५६३ विद्यार्थ्यांनी हजेरी लावली.

जिल्ह्यात एकाही केंद्रावर कॉपीचा प्रकार आढळून आला नाही, ज्यामुळे प्रशासनाचे ‘कॉपीमुक्त अभियान’ यशस्वी होताना दिसत आहे.

Popular Articles