हंसराज,प्रतिनिधी भंडारा :- केंद्र व राज्य शासनाच्या जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय भंडारा यांनी खेलो इंडिया तलवारबाजी प्रशिक्षण केंद्र भंडारा यांनी जागतिक महिला दिनानिमित्त भंडारा जिल्ह्यात प्रथमच 100 मीटर,200 मीटर, व 400 मीटर धावणे स्पर्धेचे आयोजन दिनांक 8 मार्च,2026 रोजी करण्यात येणार आहे.तरी सर्व शाळेतील,महाविद्यालय विद्यार्थींनी व महिलांनी या स्पर्धेत सहभाग घ्यावा,असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी लतिका लेकुरवाळे यांनी कळविले आहे.अधिक माहितीसाठी सौरभ देवेंद्रसिंह तोमर मो.क्र.9730033886 प्रशिक्षक खेलो इंडिया तलवारबाजी प्रशिक्षण केंद्र यांच्याशी संपर्क साधावा.असे संबंधित विभागानी कळविले आहे.








