spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

अवैध अग्निशस्त्र बाळगल्याप्रकरणी चौघाला अटक

– एकूण १२ लक्ष ३१ हजार रुपयाच्या मुद्देमाल जप्त 

सचिन चौरसिया, प्रतिनिधी रामटेक :- तालुक्यातील देवलापार येथील नागपूर-जबलपूर मार्गावर वाहनांची तपासणी दरम्यान पोलिसांनी अवैध अग्निशस्त्र बाळगणाऱ्या ४ आरोपीला बुधवार (दि. ४) अटक करण्यात आली. आरोपीकडून १२ लक्ष ३१ हजार रुपयाच्या मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्यांच्यावर देवलापार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जुना पोलीस स्टेशन समोर देवलापार चे ठाणेदार नारायण तुरकुंडे हे आपल्या पोलीस स्टॉफसह नाकाबंदी लावून वाहनांची तपासणी करीत असतांना पांढऱ्या रंगाची केटा चारचाकी गाडी क्र. एमपी २८ सीबी ३००८ सिवनीकडून नागपूर दिशेने येतांनी दरम्यान संशय आला असता तिला थांबवून तपासणी केली असता वाहनात चार इसम दिसून आले. यापैकी एकाच्या कमरेला देशी बनावटीचे सिल्वर रंगाचे माउझर (अग्नीशस्त्र) दिसुन आल्याने तत्काळ चौकशी करून त्यांच्या मुसक्या आवळण्यात आल्या. जमाल अहमद जावेद ईक्बाल (वय २६,रा. मोमीनपुरा नागपूर), दानिश अब्दुल गफार अब्दुल अफरीदी (वय २५, रा. अधरताल, जबलपूर), शहवाज मेहबूब आलम (वय ३१, रा. गोहलपूर नवी वस्ती जबलपूर) व रियाज मेहबूब खान (वय २५,रा. बोहरा बाग, जबलपूर) अशी आरोपींची नावे असून त्यांचेकडुन देशी माऊजर, दोन जिवंत काडतुस, दोन आयफोन, तथा इतर कंपनीचे मोबाईल तथा केटा कार असा एकुण १२ लक्ष ३१ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर देशी माऊजर (अग्नीशस्त्राबाबत) बाबदचा आरोपींना परवाना विचारला असता कोणताही परवाना नसून स्वतःसाठी आणले असल्याचे त्यांनी सांगितले. देवलापार पोलिसांनी आरोपींविरूध्द पोस्टे देवलापार येथे अप.क ११३/२६ कलम ३(५) भा.न्या.स सहकलम ३,२५ भा.इ.का सहकलम १३५,३७(१) (३) मपोका अन्वये गुन्हा नोंद करून आरोपीस अटक करण्यात आले. कार्यवाही पोलीस अधीक्षक हर्ष पोद्वार, अप्पर पोलीस अधीक्षक अनिल म्हस्के व उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश बरकते यांचा मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नारायण तुरकुंडे, पो.उप निरीक्षक अमोल तांबे, पो.उप. निरीक्षक वर्षा गायकवाड, अनिल कोकोडे, शिवा नागपूरे, सचिन येळकर, केशव फड, हेमंत राठोड, चालक देवांगन, फारूग मुंजेवार व होमगार्ड पथकाने केली. पुढील तपास देवलापार पोलीस करीत आहे.

Popular Articles