spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

माता व बालक नियमित लसीकरणापासून वंचित राहू नये

– नियमित लसीकरणाबाबत टास्क फोर्स समितीच्या बैठकीत घेतला आढावा

 नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या माध्यमातून शहरातील मनपा रुग्णालय, शासकीय व खासगी दवाखान्यांमध्ये होणाऱ्या नियमित लसीकरणापासून वंचित राहिलेल्या माता व बालकांचे लसीकरण व उपाययोजनांच्या अनुषंगाने गुरुवारी (ता. 05) शहर टास्क फोर्सची समितीची बैठक मनपा मुख्यालयातील मा. अतिरिक्त आयुक्त सभाकक्षात पार पडली. यावेळी ज्या बालकांचे लसीकरण झालेले नाही, त्याकरिता विशेष प्रयत्न करून ते लसीकरण वेळीस पूर्ण करावे, अशी सूचना जागतिक आरोग्य संघटनेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. मोहम्मद साजीद यांनी झोनल वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिली.

बैठकीस अतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार, माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. सरला लाड, जागतिक आरोग्य संघटनेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. मोहम्मद साजीद खान, साथरोग अधिकारी डॉ.गोवर्धन नवखरे, झोनल वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनील कांबळे, डॉ.वर्षा देवस्थळे, डॉ.जयश्री चन्ने, डॉ. शीतल वंदिले, डॉ. गजानन पवाने, डॉ. विजयकुमार तिवारी, डॉ. सुलभा शेंडे, डॉ. ख्वाजा मोईनुद्दीन, डॉ. दीपांकर भिवगडे, एम.एस.यू चे वरिष्ठ सार्वजनिक आरोग्य तज्ज्ञ डॉ. वीरेंद्र वानखेडे, पी.एच.एन अर्चना खाडे, एम.एस.यू चे सवांद तज्ज्ञ  स्नेहल करंजेकर, क्षेत्र लसीकरण नियंत्रण संदीप फुंडे, प्रमोद दहाट,सोनल सियाग, मोनाली बावनकर यांच्यासह इतर संबंधित अधिकारी व तज्ज्ञ उपस्थिती होते.

या बैठकीत शहरातील नियमित लसीकरण कार्यक्रमाचा आढावा घेण्यात आला. बालक, गर्भवती माता व लाभार्थ्यांपर्यंत लसीकरण सेवा अधिक प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली. लसीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण करणे, क्षेत्रीय पातळीवरील अडचणी, जनजागृती वाढवणे व विविध विभागांमधील समन्वय अधिक बळकट करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. बैठकीत शहरातील साथरोग निर्मुलनाच्या उंबरठ्यावर आहेत, आपल्या सतत प्रयत्नांमुळे हे साथरोग समूळ नष्ट होतील असे जागतिक आरोग्य संघटनेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. मोहम्मद साजीद यांनी यावेळी सांगितले.

बैठकीत सर्वप्रथम डॉ. सरला लाड यांनी बैठकीच्या मुद्द्यांची माहिती दिली. त्यानंतर डॉ. साजीद यांनी झोननिहाय नियमित लसीकरण कार्यक्रमाचा आढावा घेत माहिती दिली. त्यांनी संगणकीय सादरीकरणाद्वारे शहरातील प्रत्येक झोनअंतर्गत असलेली नियमित लसीकरणाची स्थिती मांडली. नवजात बालकांपासून ते गरोदर मातांना विविध प्रकारचे लसीकरण केले जात असून, या लसींपासून कुणीही माता आणि बालक वंचित राहू नये यावर भर देण्यात आला. संपूर्ण शहरात नवजात बालकांचे पहिल्या दिवसांपासून इतर सर्व नियमित लसीकरण हे वेळेवर योग्यरित्या आणि शंभर टक्के व्हावे, यादृष्टीने झोनस्तरावर नियोजन आणि कार्यवाही करण्याचे निर्देश यावेळी जागतिक आरोग्य संघटनेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. मोहम्मद साजीद खान यांनी झोनल वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिले.

यासोबतच राज्य शासनाच्या धोरणानुसार १४ ते १५ वर्ष वयोगटातील (१५ वा वाढदिवस न झालेल्या) मुलींना HPV लस देण्याबाबत मार्गदर्शक सूचना बैठकीत मांडण्यात आल्या. माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. सरला लाड यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, येत्या ३ महिन्यांत मनपा अंतर्गत 51 UPHC केंद्रांमार्फत १४ ते १५ वर्ष वयोगटातील मुलींना HPV लस देण्याचे नियोजन करण्यात येणार आहे जेणेकरून भविष्यात गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगापासून संरक्षण मिळण्यास मदत होईल.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.