spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

बाबा ताजुद्दीन औलिया यांच्या ८३ व्या वार्षिक उर्सची सुरुवात

खापा :- वाकी येथे बाबा ताजुद्दीन औलिया यांच्या ८३ वा वार्षिक उर्स मंगळवार दि. ३ मार्च ते सोमवार ९ मार्च २०२६ दरम्यान वाकी येथे साजरा करण्यात येत आहे. दि. ३ मार्च रोजी मंगळवारला नागपूर येथील ताजबाग शरीफ येथून शाही संदल निघून प. पु. काशिनाथ डहाके पाटील यांच्या वाकी येथील वाड्यात आला. तेथून सायंकाळी ६ वाजता संत ताजुद्दीन बाबा दरबारात पोहोचला. परंपरेनुसार सज्जादा नशीन ज्ञानेश्वरराव डहाके पाटील यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले. वार्षिक उर्सचे उद्घाटन सायंकाळी ६ वाजता सावनेर कळमेश्वर क्षेत्राचे आमदार डॉ. आशिष देशमुख यांच्या अध्यक्षेखाली तसेच माजी जिला परिषद उपाध्यक्ष मनोहर कुंभारे, जिल्हा उपाध्यक्ष रामराव मोवाडे यांच्या प्रमुख उपस्थिततीमध्ये मान्यवरांच्या हस्ते महापूजा करून उर्स प्रारंभ करण्यात आला.

उर्स कार्यक्रमादरम्यान दररोज मिलाद, कव्वाली असे धार्मिक कार्यक्रम घेण्यात आले. ६ मार्चला श्रीमंत राजे रघुजीराव भोसले व श्रीमंत राजे मुधोजीराव भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत कुल समारंभ कार्यक्रम होईल. दि. ७ मार्चला सकाळी १० वा ह. भ. प. हरिशचंद्र वंजारी महाराज लाडगाव काटोल यांचे कीर्तन होईल. दि. ८ मार्चला सकाळी १० वाजता पर्यंत ह. भ. प. कन्हेरकर महाराज मु. चिखलसावंगी जि. अमरावती यांचे किर्तन होईल. दिनांक ९ मार्चला सकाळी १० वाजता पर्यंत ह. भ. प. गुरुवर्य पंकज महाराज पवार कारंजा लाड वाशिम यांचे गोपाल काल्याचे किर्तन होऊन उत्सवाचा समारोप होईल. उर्सनिमित्त परिवहन महामंडळ तर्फे अतिरिक्त बसेसची व्यवस्था नागपुर, कामठी व सावनेर वरुण करण्यात येईल. तसेच या उर्स मध्ये विविध प्रकारचे दुकाने, मनोरंजन पार्क, खेळण्याचे दुकाने लावण्यात आलेले आहे. तसेच दररोज ट्रस्ट कडून महाप्रसादाचे वितरण करण्यात येईल. उत्सवादरम्यान भाविकांनी नियमाचे पालन करूनच दर्शन घ्यावे. तसेच भाविकांनी कोठेही अनावश्यक गर्दी करु नये. भाविकांनी बाबांच्या दर्शनाचा लाभ घ्यावा, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष तथा सज्जदा नशीन प्रभाकरराव डहाके पाटील, सचिव ज्ञानेश्वरराव डहाके पाटील व विश्वस्त मधुकरराव टेकाडे, किशोर चिद्दरवार, सचिन डांगोरे यांनी दिली.

Popular Articles