spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

भंडारा पोलिसांचा मोठा दणका: हायवेवर लुटमार करणाऱ्या १५ गुंडांच्या टोळीवर ‘मकोका’!

– पोलीस अधीक्षकांची कडक कारवाई

हंसराज,प्रतिनिधी भंडारा :- भंडारा जिल्ह्यात दहशत पसरवणाऱ्या आणि हायवेवर गाड्या अडवून चालकांना लुटणाऱ्या एका टोळीवर पोलिसांनी ‘मकोका’ हा कडक कायदा लावला आहे. गणेशपूर भागातील चिराग गजभिये आणि त्याच्या १४ साथीदारांनी मिळून ही टोळी बनवली होती. या कारवाईमुळे जिल्ह्यातील गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत.

या टोळीने भंडारा ते नागपूर राष्ट्रीय महामार्गावरून जाणाऱ्या वाहनांना अडवून, चालकांना लाठी व शस्त्रांच्या धाकावर धमकावणे, वाहनांच्या काचा फोडणे आणि चालकांकडून जबरदस्तीने पैसे हिसकावून नेण्याचे सत्र सुरू केले होते. या संदर्भात १७ डिसेंबर २०२५ रोजी भंडारा पोलीस ठाण्यात गुन्हा (क्र. १७२३/२०२६) भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१०(२), ३११, १२६(२), ३२४(४) अन्वये दाखल करण्यात आला होता.

सुधारण्याची संधी देऊनही गुन्हेगारी सुरूच

या टोळीतील मुख्य आरोपी चिराग गजभिये आणि त्याच्या साथीदारांवर यापूर्वीही खून, खुनाचा प्रयत्न आणि हाणामारीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी त्यांना याआधी जिल्ह्याबाहेर काढले होते (तडीपार केले होते), पण जामिनावर सुटल्यावर त्यांनी पुन्हा नवी टोळी तयार केली आणि लोकांमध्ये दहशत निर्माण केली. ते सुधारत नसल्याचे पाहून पोलीस अधीक्षकांनी त्यांच्यावर ‘मकोका’ लावण्याचा निर्णय घेतला.

चिराग नमोद गजभिये (टोळी प्रमुख)२८ रमाबाई आंबेडकर वॉर्ड गणेशपूर , सागर देवानंद भुरे २६ रमाबाई आंबेडकर वार्ड , आकाश मयूर बोरकर २० गणेशपूर , श्याम भास्कर साठवणे २५ पिंडकेपार , कुणाल राजू भोंगाडे २५ गणेशपूर , मोहित जयंत शेंडे २१ गणेशपूर , रोशन श्रीकांत सिधीमेश्राम २४ दहेगावं / धानला , भावेश नरेंद्र धाबेकर १८ विध्यानगर , सचिन सुदाम साखरकर २० विध्यानगर , अस्मित रामेश्वर कुकडे १९ वडोदा , साहिल चंद्रभोज रामटेके २२ गणेशपूर , अयूर भगवान थोटे २२ जवाहरनगर , यश मोरेश्वर भागडकर १९ नवीन नगर पार्डी , निल उदाराम आंबीलढूके २५ दहेगावं, मोनार्च प्रकाश शेंडे २५ विध्यानगर,

साध्या कायद्याने हे गुंड जुमानत नसल्यामुळे, पोलीस अधीक्षक नूरुल हसन यांनी या टोळीचा पूर्ण नायनाट करण्यासाठी ‘मकोका’ लावण्याचा प्रस्ताव दिला होता. नागपूरचे विशेष पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील यांनी या प्रस्तावाला मंजुरी दिली. आता या टोळीवर मकोकाचे कलम वाढवण्यात आले असून, त्यांना सहजासहजी जामीन मिळणार नाही.

ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक नूरुल हसन, अप्पर पोलीस अधीक्षक निलेश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली नितीनकुमार चिंचोळकर पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा भंडारा , उल्हास भुसारी पोलीस निरीक्षक भंडारा, स्थानिक गुन्हे शाखेचे व भंडारा पोलीस स्टेस्टन चे अंमलदार पथकाने केली आहे.

Popular Articles