spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

स्मार्ट मीटरच्या नावाखाली महावितरणचा गोरखधंदा? बिल न भरताच 30 दिवसात लाईट बंद

यासीन शेख, गोंदिया :- सडक अर्जुनी व देवरी तालुक्यात महावितरण कंपनीकडून स्मार्ट मीटर बसवण्याचे काम वेगाने सुरू असून, या प्रक्रियेवर आता नागरिकांकडून गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. स्मार्ट मीटर बसवताना ग्राहकांना संपूर्ण माहिती न देता त्यांची दिशाभूल केली जात असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.

नागरिकांच्या म्हणण्यानुसार, स्मार्ट मीटरमध्ये अशी प्रणाली बसवण्यात आलेली आहे की, जर ग्राहकाने महिनाभरात वीज बिल भरले नाही तर ३० ते ३२ दिवसांनंतर वीज पुरवठा आपोआप बंद होतो. त्यानंतर ग्राहकाने बिल भरल्यानंतरच काही वेळानंतर पुन्हा वीज पुरवठा सुरू होतो.

महावितरण चे कोर्ट गाइडलाईन प्रमाणे कोणत्याही ग्राहकाची लाईट बंद करण्या अगोदर 15 दिवस पूर्ण नोटीस दिली जाते. पण महावितरण कडून कोणतीही पूर्व सूचना न देता ग्राहकांची लाइट कापली जाते ही महावितरण ची लापरवाही आहे

मात्र ही महत्त्वाची माहिती महावितरणचे कर्मचारी किंवा अधिकारी ग्राहकांना आधी सांगत नसल्याचा आरोपही नागरिकांनी केला आहे. अनेक ठिकाणी घरात कोणी नसताना देखील कर्मचारी येऊन स्मार्ट मीटर बसवले जात असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

ग्रामीण भागातील अनेक गरीब व शेतकरी कुटुंबांना अँड्रॉइड मोबाईल किंवा ऑनलाइन प्रणालीची पुरेशी माहिती नसते. त्यामुळे एसएमएस किंवा मेलद्वारे येणाऱ्या सूचनांची माहिती त्यांना मिळत नाही. अशा परिस्थितीत बिल वेळेत भरले नाही म्हणून अचानक वीज बंद झाल्यास गरीब कुटुंबांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागू शकते.

या सर्व प्रकारामुळे स्मार्ट मीटरच्या नावाखाली महावितरण नागरिकांची फसवणूक करत आहे का? असा सवाल आता स्थानिक नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. प्रशासनाने या प्रकरणाची दखल घेऊन नागरिकांना योग्य माहिती देण्याची मागणीही करण्यात येत आहे.

अभियंता सडक अर्जुनी सुनील रेवतकर डिप्टी एक्झॅकेटिव इंजिनिअर

आम्ही ग्राहकांना स्मार्ट मीटर संदर्भात कोणतीही माहिती देत नाही. आम्हाला टार्गेट आहे. स्मार्ट मीटर संदर्भात आम्ही ग्राहकांना पूर्ण पाने माहिती दिली तर ग्राहक आम्हाला स्मार्ट मीटर बदलहुं देणार नाही

स्मार्ट मीटर चे बिल भरला नाही तर 30 ते 45 दिवसाच्या आता ऑटोमॅटिक लाइट बंद होते बिल भरला नंतर ऑटोमॅटिक सुरू होते.

Popular Articles