किशोर साहू, मौदा :- ग्रा पं येसंबा येथे आज रविवार (ता. ८ मार्च) ला जागतिक महिला दिनानिमित्त क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन ग्रामसंघाच्या अध्यक्ष सारिका राऊत यांच्या हस्ते करून जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी उपसरपंच धनराज हारोडे, पोलीस पाटील नरेंद्र राऊत, ग्रामविकास अधिकारी विनोद तागडे, ग्रामपंचायत सदस्या ज्ञानेश्वरी घरजाळे, आय.सी.आर.पी. हिरा चकोले, अंगणवाडी सेविका माया चकोले, आशावर्कर सुषमा गजभिये,शकुंतला बांगडे,वच्छला राऊत, कमला बांगडे,निधी मेश्राम, अश्विनी गजभिये ,अरूणा बांगडे, प्रमिला हारोडे, लिला चौधरी,प्रतिमा हारोडे,छबी पाठेकर, आश्लेषा पानतावणे, हसिना मेश्राम, चेतना महाल्ले, दर्शना हारोडे,गणेश बांगडे, हर्षद हारोडे, आणि बालगोपाल उपस्थित होते.








