spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

निरोगी जीवनशैली व पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत टायगर सिटी सायकल वारी धापेवाडाकडे रवाना होणार रविवारी

नागपूर :- टायगर सिटी सायकलिंग असोसिएशनच्या वतीने रविवार, २२ नोव्हेंबर रोजी, सकाळी ६.३० वाजता ऑरेंज सिटी चौक, खामला येथे एक सायकलच्या प्रतिकृतीसाठी शिवानी दाणी – वखरे यांच्या हस्ते भूमिपूजन झाल्यावर नागपूर ते धापेवाडा सायकल वारीला प्रारंभ होणार आहे. या वारीत खुद्द शिवानी ह्या भाग घेणार आहेत. या सायकल वारीत नागपूर व विदर्भातील सायकलप्रेमी मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. सायकलिंगचा प्रसार, निरोगी जीवनशैलीचा स्वीकार, पर्यावरण संवर्धन तसेच धार्मिक व सांस्कृतिक परंपरेचा संगम घडविण्याच्या उद्देशाने या वारीचे आयोजन करण्यात आले आहे. सायकलिंग ही केवळ व्यायामाची पद्धत नसून प्रदूषणमुक्त पर्यावरण, आरोग्य आणि सामाजिक एकात्मतेचा संदेश देणारी चळवळ असल्याचे आयोजकांनी सांगितले. या वारी दरम्यान धापेवाडा येथील श्री विठ्ठल – रुक्मिणी मंदिरात दर्शन, आरती व रिंगण कार्यक्रम होईल. रिंगण डॉ. आशिष देशमुख, MLA सावनेर – कळमेश्वर यांच्या उपस्थितीत होणार आहे. यात सहभागी होण्याची संधी सायकल प्रेमींना मिळणार आहे. नागपूरसह विदर्भातील सायकल प्रेमींनी या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन टायगर सिटी सायकलिंग असोसिएशनच्या वतीने करण्यात आले आहे. असे प्रसिद्धी पत्रकाद्वारे जयंत मेंढी, दिलीप वरकड आणि धरमपाल फुलझेले यांनी कळविले आहे.

Popular Articles