spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

अड्याळ पोलिसांचा रेती तस्करांना मोठा दणका; दोन ट्रॅक्टरसह १६ लाखांचा मुद्देमाल जप्त

– ‘ऑलआउट ऑपरेशन’ दरम्यान दोन वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई; दोन आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल

हंसराज,प्रतिनिधी भंडारा अड्याळ :- भंडारा जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार राबविण्यात येत असलेल्या ‘ऑलआउट ऑपरेशन’ अंतर्गत अड्याळ पोलिसांनी अवैध रेती वाहतुकीवर मोठी कारवाई केली आहे. दोन वेगवेगळ्या कारवायांमध्ये पोलिसांनी विनापरवाना रेतीची चोरी करणाऱ्या दोन ट्रॅक्टरसह एकूण १६ लाख १२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

पहिली कारवाई: दावेझारी टोला येथील आरोपी अटकेत

अड्याळ पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक चव्हाण हे आपल्या पथकासह पेट्रोलिंगवर असताना त्यांना एक विना क्रमांकाचा सिल्व्हर रंगाचा ‘आयशर’ कंपनीचा ट्रॅक्टर (मुंडा ५४८) आणि हिरव्या रंगाची ट्रॉली संशयास्पद रितीने येताना दिसली. या ट्रॅक्टरची तपासणी केली असता, त्यात एक ब्रास अवैध रेती मिळून आली. याप्रकरणी पोलिसांनी चालक विजेश रामदयाल रहांगडाले (वय ३१, रा. दावेझारी टोला, ता. तुमसर) याला ताब्यात घेतले. ८ लाख रुपयांचा ट्रॅक्टर आणि ६ हजार रुपयांची रेती असा एकूण ८ लाख ६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

दुसरी कारवाई: पवनी तालुक्यातील आरोपीवर झडप

दुसऱ्या एका कारवाईत, उपनिरीक्षक चव्हाण व त्यांच्या पथकाने विना पासपरवाना रेतीची वाहतूक करणारा निळ्या रंगाचा विना क्रमांकाचा ‘स्वराज’ कंपनीचा ट्रॅक्टर आणि लाल रंगाची ट्रॉली पकडली. यामध्येही एक ब्रास अवैध रेती चोरून नेली जात होती. याप्रकरणी आरोपी अतुल किशन मेश्राम (वय २५, रा. वलनी, ता. पवनी) याला अटक करण्यात आली. या कारवाईतही ८ लाख ६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

या दोन्ही कारवायांमध्ये मिळून एकूण १६ लाख १२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, दोन्ही आरोपींविरुद्ध अड्याळ पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक १२१/२०२६ आणि १२२/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०५ (ई) अन्वये गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.

ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक नूरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे, आणि सहायक पोलीस निरीक्षक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक चव्हाण व अड्याळ पोलीस कर्मचाऱ्यांनी केली. या कारवाईमुळे रेती तस्करांमध्ये खळबळ माजली असून, पोलीस स्टेशन अड्याळचे अधिकारी पुढील तपास करत आहेत.

Popular Articles