spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

नासुप्र ‘फ्री होल्ड’साठी नझूलप्रमाणे स्वतंत्र धोरण

– दटकेंनी मांडलेल्या लक्षवेधीवर मंत्री मिसाळ यांचे उत्तर

नागपूर सुधार प्रन्यास (नासुप्र) क्षेत्रातील भाडेतत्त्वावरील प्लॉट फ्री होल्ड करण्याबाबत स्वतंत्र धोरण आणावे लागेल, अशी स्पष्ट भूमिका आमदार प्रवीण दटके यांनी रविवारी विधानसभेत लक्षवेधी मुद्द्याव्दारे मांडली.

मंत्री माधुरी मिसाळ यांनी अधिवेशन काळातच नागपूर सुधार प्रन्यासच्या जागा फ्री होल्ड करण्याच्या निर्णय घेणार असल्याबाबत आश्वासनही दिले.

विधानसभेत लक्षवेधीच्या माध्यमातून आमदार प्रवीण दटके यांनी हा मुद्दा उपस्थित केला. त्यांनी सांगितले की, नागपूर महापालिकेच्या २२ अभिन्यासांमध्ये सुमारे ९ हजार प्लॉट

भाडेतत्त्वावर देण्यात आले आहेत. यातील काही प्लॉट मनपा अस्तित्वात येण्यापूर्वीचे असून संबंधितांकडून जमिनीचे अधिमूल्यही आकारण्यात आले आहे. तसेच नासुप्रकडून तब्बल ६१ हजार ५२७निवासी प्लॉट भाडेतत्त्वावर देण्यात आले असून गेल्या सुमारे १०० वर्षांपासून ते लीजवर आहेत. या निर्णयाचा नागपूर शहरातील सुमारे १० लाख नागरिकांना थेट लाभ होणार असल्याने मनपा आणि नासुप्रचे प्लॉट नझूल धोरणाच्या धर्तीवर फ्री होल्ड करावेत अशी ठोस मागणी दटके यांनी केली

यावर उत्तर देताना मंत्री माधुरी मिसाळ म्हणाल्या की, ‘सध्या या प्लॉट्ससाठी नियमित भाडेकरार अस्तित्वात आहेत. फ्री होल्ड करण्यासंदर्भात नासुप्रकडून १२ डिसेंबर २०२५ रोजी प्रस्ताव प्राप्त झाला आहे.याच अधिवेशनात निर्णय घेणार असल्याचेही मिसाळ यांनी सांगितले.

भाडेपट्टीवर देण्यात आलेल्या जमिनी सध्या तेथे राहात असलेल्या रहिवाशांच्या मालकीच्या होतील, अशी ही फ्री होल्ड योजना आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.