spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

यंत्रणांचा अधिकाधिक उपयोग करून जलपर्णीचे निर्मुलन करा

– महापौर निता ठाकरे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

नागपूर :- अंबाझरी तलावातील जलपर्णी समूळ नष्ट करण्यासाठी मनपाकडे असलेल्या यंत्रणांचा अधिकाधिक उपयोग करावा व लक्ष्य निर्धारित करून जलपर्णीचे निर्मुलन करावे, असे निर्देश महापौर निता ठाकरे यांनी (ता. 10) अधिकाऱ्यांना दिले.

काही दिवसांपूर्वी महापौर निता ठाकरे यांनी अंबाझरीतील पाणी प्रदूषित करणाऱ्या जलपर्णीचे निर्मुलन करण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांसाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांसह दौरा केला होता. यावेळी जलपर्णीच्या निर्मूलनासाठी मोहिम राबविण्याचे निर्देश दिले होते. यानंतर मनपा प्रशासनाने केलेल्या कामाचा आढावा महापौरांनी मंगळवारी घेतला. यावेळी उपमहापौर लिला हाथीबेड, सत्तापक्ष नेते नरेंद्र (बाल्या) बोरकर, नगरसेवक योगेश पाचपोर, अधीक्षक अभियंता डॉ. श्वेता बॅनर्जी, उपायुक्त राजेश भगत, सहाय्यक आयुक्त राजकुमार मेश्राम, मुख्य स्वच्छता अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले, सामाजिक कार्यकर्ते अविनाश केवटे उपस्थित होते.

जलपर्णीचे निर्मुलन करण्यासाठी सध्या मनपातर्फे पोकलेन मशीन, लॉँगब्रुमचा वापर केला जात असल्याचे अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले. मनपाकडे असलेल्या या मशीनरीचा दोन शिफ्टमध्ये उपयोग करावा, उन्हाळ्यात या मशीनरीचा जास्तीतजास्त वापर करून जलपर्णीचे निर्मुलन करावे, असे निर्देश ही महापौर निता ठाकरे यांनी दिले.

जलपर्णीचे समूळ नष्ट करण्यासाठी विविध माध्यमातून प्रयत्न करण्याची गरज असल्याचे नगरसेवक योगेश पाचपोर यांनी निदर्शनास आणून दिले. यासाठी पोकलेनच्या मशीनचा वापर, स्थानिक मच्छिमाराचा उपयोग, जलपर्णीच्या तज्ज्ञांचा सल्ला घेऊन जलपर्णी समूळ नष्ट करण्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. नगरसेवक पाचपोर यांच्या सूचनेनुसार जलपर्णी निर्मूलनासाठी प्रशासनाने लक्ष्य ठरवून काम करण्याची आवश्यकता असल्याचे महापौरांनी सांगितले.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.