spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

पोरवाल कनिष्ठ महाविद्यालयात महिला दिन संपन्न

कामठी :- सेठ केसरीमल पोरवाल कनिष्ठ महाविद्यालय,कामठी येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथीच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पोरवाल कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. डॉ.सुधीर अग्रवाल तर प्रमुख वक्ता म्हणून डॉ. नीता वानखेडे विशेष अतिथी प्रा. विश्वनाथ वंजारी, महिला प्रतिनिधी म्हणून प्रा स्वाती निंबाळकर व प्रा रूपाली आढाऊ मंचावर उपस्थित होते. याप्रसंगी प्रमुख उपस्थित मान्यवरांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व विद्येची आराध्य देवता सरस्वती यांच्या प्रतिमेला मारल्यार्पण करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख वक्त्या डॉ नीता वानखेडे यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथी निमित्याने त्यांच्या कार्याचा गौरव करत स्त्रियांनी अधिक सक्षम होण्याचे आवाहन केले.

हा दिवस केवळ उत्सव नसून, स्त्री-पुरुष समानतेच्या संकल्पाचा एक महत्त्वाचा टप्पा ठरला असल्याचे त्यांनी सांगितले तर प्रमुख अतिथी प्रा विश्वनाथ वंजारी यांनी महिलांनी महिलांचा सन्मान करावा यावर भाष्य करत असताना समाजात महिलांना मिळत असलेल्या दुय्यम दर्जावर चिंता व्यक्त केली तर अध्यक्षीय भाषणातून प्रा डॉ सुधीर अग्रवाल यांनी आंतरराष्ट्रीय महिला दिनाची पार्श्वभूमी सांगितली.हा दिवस महिलांच्या सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक आणि राजकीय उपलब्धतेचा सन्मान करण्यासाठी साजरा केला जातो,असे प्रतिपादन करताना महिलांचा प्रत्येक क्षेत्रात सन्मान करण्याची व महिलांप्रती समाजाचा दृष्टिकोन बदलण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केले. कार्यक्रमाचे संचालन प्राध्यापिका सोनल मालवीय यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा.सौरभ बनसोड यांनी केले. कार्यक्रमाला बहुसंख्य शिक्षक, प्राध्यापक, शिक्षकेत्तर वकर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

विशेष सांस्कृतिक कार्यक्रम, सन्मान सोहळा आणि स्त्री सक्षमीकरणावर आधारित व्याख्याने आयोजित केली गेली होती, ज्यामध्ये विद्यार्थिनी व प्राध्यापिकांनी सक्रिय सहभाग नोंदवला.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.