Home Latest News शिवशक्ती ज्येष्ठ नागरिक मंडळातर्फे जेष्ठ नागरिकांचा वाढदिवस उत्साहात साजरा

शिवशक्ती ज्येष्ठ नागरिक मंडळातर्फे जेष्ठ नागरिकांचा वाढदिवस उत्साहात साजरा

0
37

– पूर्ण ब्रह्म अभियान :

नागपूर :- शिवशक्ती जेष्ठ नागरिक मंडळ, अनमोल नगर, शिवाजी पार्क, वाठोडा रिंग रोड, नागपूरच्या वतीने वार्षिक कार्यक्रम १ मार्च रोजी नुकताच संपन्न झाला. जेष्ठ नागरिकांचा वाढदिवस कार्यक्रम पूर्ण ब्रम्ह अभियान व भव्य दिन शेड चे उद्घाटन आमदार कृष्णा खोपडे यांचे शुभहस्ते करण्यात आले. याप्रसगी कार्यक्रमाचे अध्यक्ष राजु मिश्रा व सचिव जेष्ठ नागरिक प्रतिष्ठान नागपूर खालील अतिथिगण कार्यक्रमाला उपस्थित होते. सुरेश उरकुडे-पूर्ण ब्रम्ह अभियान समिति प्रमुख, डॉ. अमोल धांडे-संचालक आनंदम् हॉस्पिटल श्रीकृष्ण नगर, अभयजी घाटोळे संस्थापक संताजी महिला सहकारी पत संस्था नागपूर, संजय पडोळे-उप अभियंता लोककर्म विभाग म.न.पा. नागपूर, सुभाष घाटे संस्थापक अध्यक्ष संताजी नवयुवक मंडळ नागपूर, श्यामजी वैद्य सेवानिवृत्त उप अभियंता जलसंपदा विभाग प्रमुख मॉ सरस्वती म्युझीकल तर्फे संगीतमय कार्यक्रम, नवनिर्वाचित नगर सेवक- बंटी कुकडे, शारदा सुरेश बारई, लग्नाला 50 वर्षे पूर्ण झालेले जोडप संतोष तलमले (कोषाध्यक्ष)-कमल संतोष तलमले रा.अनमोल नगर नागपूर, जेष्ठ नागरिकांचा वाढदिवस सत्कार करण्यात आला. मार्गदर्शन कृष्णा खोपडे (पूर्व नागपूर आमदार), राजु मिश्रा-सचिव नागपूर, डॉ.अमोल धांडे-संचालक आनंदम् हॉस्पिटल, बंटी कुकडे नगरसेवक, शारदा सुरेश बारई-नगरसेवक, श्याम वैद्य-सेवानिवृत्त अभियंता जलसंपदा विभाग नागभीड यांच्या उपस्थित कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुरेश धांडे, प्रमोद झारकरिया, संतोष तलमले, अशोक बरडे, विजय काळबांडे, गणेशराम बुरडकर, महेश बांगरे, मनोहर लूहारिया, छत्रपाल जिभकाटे, भास्कर उराडे, सुरेश केकडे ई. अशी माहिती कोषाध्यक्ष संतोष तलमले यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.