spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

राजेंद्र हायस्कूल येथे आरोग्य तपासणी शिबिर

– परिक्षेचा काळ आहे, विद्यार्थी मित्रांनो आरोग्याची काळजी घ्या – मुख्याध्यापक सुनिल नेहारे 

खापा, वार्ताहर :- स्थानिक पी. एम. श्री. नगर परिषद राजेंद्र हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे (दि.१२) गुरुवारला आरोग्य तपासणी शिबिर व मुलींकरीता विशेष मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले होते. डॉ. दिक्षा भिरड (वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र, खापा) यांच्या नेतृत्वात आरोग्य सेविका यांनी विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करून औषध वितरण केले. डॉ. दिक्षा भिरड यांनी मुलींना आरोग्य विषयक विशेष मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून शाळेचे मुख्याध्यापक सुनिल नेहारे उपस्थित होते.

शिबिरात विद्यार्थ्यांची विविध प्रकारच्या आरोग्य तपासण्या करण्यात आल्या. त्यामध्ये रक्तदाब, रक्त तपासणी, दंत तपासणी आणि सामान्य आरोग्य तपासणी यांचा समावेश होता. विद्यार्थ्यांना त्यांच्या आरोग्याविषयी महत्त्वाची माहिती देण्यात आली आणि त्यांच्या शंका दूर करण्यात आल्या.

शाळेच्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आरोग्याबाबत जागरूकता निर्माण झाली. प्रमुख पाहुण्यांनी या उपक्रमाचे कौतुक केले व भविष्यातही असे उपक्रम घेण्याचे आवाहन केले. सर्व उपस्थितांनी या शिबिराचा मनमुराद आनंद घेतला आणि विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी शाळेने उचललेल्या पावलांचे अभिनंदन केले.

पर्यवेक्षक शामराव खडसे, जेष्ठ शिक्षिका निता चामाटे, असलम खान, नम्रता मडके, सोनाली माडेकर, भाग्यश्री सांडे, सरिता आत्राम, ज्योती गजभिये, प्रमोद बावनकुळे, सुनील गाडीगोणे, सुनील भांगरे, कुमार पाटील, विजय नांदेकर, अनिल टेकाडे, इमरान खान यांच्यासह शाळेतील शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Popular Articles